फोडाफोडीला सुरुवात! भाजपच्या माजी मंत्र्यांचा आपमध्ये प्रवेश

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः गोव्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. भाजपचे माजी मंत्री तथा शिरोडाचे माजी आमदार महादेव नाईक यांनी शुक्रवारी आम आदमी पार्टी (आप) मध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर येेतेय. नवी दिल्लीत जाऊन दिल्लीचे मुख्यमंत्री तथा ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘आप’मध्ये प्रवेश केला असल्याचं समजतंय.
हेही वाचाः मूर्तीमंत चैतन्य… ज्ञानाचा खजिना ‘भाई खलप’
कोण होते उपस्थित?
महादेव नाईकांच्या ‘आप’मध्ये प्रवेशाच्या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन, ‘आप’ नेते अतिशी तसंच इतरांची उपस्थिती होती.
फोडाफोडीला सुरुवात
दोन वेळा आमदार राहिलेले नाईक हे अलीकडेच ‘आप’मध्ये प्रवेश करणारे अजून एक महत्त्वाचे नेते आहेत. या अगोदर गोवा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी ‘आप’शी हातमिळवणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता गोव्याच्या राजकीय वर्तुळाच फोडाफोडीला सुरुवात झाली असल्याचा हा संकेत आहे, असंच म्हणावं लागेल.
हेही वाचाः ‘नायका’ने सेबीकडे डीआरएचपी दाखल केले
नाईकांच्या ‘आप’ प्रवेशाने गोंयकारांची सेवा करण्याचा ‘आप’चा संकल्प आणखी मजबूत
नाईक यांचं ‘आप’मध्ये स्वागत करताना गोवा आपचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले, भाजपचे माजी मंत्री तथा शिरोडाचे माजी आमदार महादेव नाईक यांचं ‘आप’मध्ये हार्दिक स्वागत. त्यांच्या पक्षात सामील होण्यामुळे गोंयकारांची सेवा करण्याचा ‘आप’चा संकल्प आणखी मजबूत होणार आहे. मनोहर पर्रीकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नाईक यांनी काम केलं होतं.