नास्नोळा येथील ‘त्या’ युवतीचा बुडून मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट

गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह कळंगुट समुद्र किनाऱ्यावर सापडला

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः नास्नोळा येथील १९ वर्षीय युवतीचा बुडून मृत्यू झाल्याचं शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झालं आहे. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह कळंगुट समुद्र किनाऱ्यावर सापडला होता. तिनं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तसंच मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्यामुळे अनेक तर्ककुतर्कही व्यक्त केले जात होते. दरम्यान शवचिकित्सा अहवालातून युवतीचा बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. युवतीचं नाव सिद्धी नाईक होतं.

हेही वाचाः वाळपई अल्पवयीन बलात्कार प्रकरणः अक्षय नाईकला पाच दिवसांची पोलिस कोठडी

बुधवारी सकाळपासून होती बेपत्ता

सिद्धी ही पर्वरी येथे एका दुकानावर काम करत होती. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांनी तिला प्रवासी बसमधून पर्वरीला जाण्यासाठी ग्रीन पार्क जंक्शनवर नेऊन सोडलं.
सकाळी १०.३० वा. तिच्या कामावरून ती दुकानात पोचली नसल्याचं फोन करून सांगण्यात आलं. शिवाय तिचा फोन लागत नव्हता. तिने आपला फोन घरीच ठेवलेला नंतर सापडला.

सोशल मीडियावरील अकाऊंट्स केले बंद

मयत सिद्धीने बुधवारी सकाळी घरातून निघण्यापूर्वी आपला फेसबुक, वॉट्सअ‍ॅप अकाऊंट बंद केला होता. तसंच तिने जाणीवपूर्वक आपला फोन घरीच ठेवला होता. जेणेकरून ती कुठे गेलीये हे कुणाला कळता कामा नये. त्यामुळे आत्महत्येचा प्लॅन ती अगोदरपासूनच करून ठेवला असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान मयत सिद्धीचा मृतदेह गुरुवारी सकाळी कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर सापडल्यानंतर तिचे फोटोज बरेच वायरल होत आहेत. त्यामुळे फोटो व्हायरल करू नका असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येतंय. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे असं सांगण्यात आलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | GIRL ASSULTED | सांस्कृतिक कार्यक्रमावेळी मुलीचे बदलले कपडे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!