उपमुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप तथ्यहीन

भाजपच्या पेडणे मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस यांची टीका

मकबूल | प्रतिनिधी

पेडणे:  उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर पेडण्यातील मतदारांमध्ये आपला-परका असा भेदभाव करत नाहीत. विकासकामे आणि योजना सर्वांपर्यंत पोचवण्याचा त्यांचा ध्यास आहे. गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते जितेंद्र गावकर यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप तथ्यहीन असून आरोप करताना गावकर यांनी स्वतःच परस्पर विरोधी विधाने करून आपलं हसं करून घेतलं आहे,  असं भाजपच्या पेडणे मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी म्हटलंय.

हेही वाचाः VACCINATION | 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी येत्या रविवारपासून ‘टीका उत्सव-3’

विधानसभेत प्रश्न उपस्थित करा

आजगावकरांनी अडचणीच्या प्रसंगी आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या मतदारसंघातील लोकांसाठी रेशन पुरवलं. यात गावकरांना गैर काय व का वाटलं, असा सवाल गावस यांनी केलाय. मोपा विमानतळासाठी संपादीत केलेली आणि वापरात आणलेल्या जमिनींसंदर्भात गावकरांनी गोवा फॉरवर्डच्या आमदारांना विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यास सांगावं, या विषयावर मुख्यमंत्री त्यांना योग्य उत्तर देतील, असं गावस म्हणालेत.

हेही वाचाः CORONA UPDATE | दिलासादायक! राज्यातील कोविड आकडेवारी आटोक्यात

विजय सरदेसाईंच्या मालमत्तेकडे लक्ष द्या

गावकरांनी बेतालपणे लुटमारीचा आरोप केलाय. दुसऱ्यावर बोट दाखवण्याआधी गावकरांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंच्या मालमत्तेकडे लक्ष द्यावं. सरदेसाईंनी अल्पावधीतच आलिशान फार्महाऊस, गोंयचे घर, पणजीत कार्यालय कसं घेतलं, त्याचा गावकरांनी शोध घ्यावा, असं गावस म्हणालेत.

हेही वाचाः आंतरमंत्रालयीन पथकाची बैठक; तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचा घेतला आढावा

गावकरांचं वक्तव्य हे अपरिपक्वतेचं लक्षण

पेडणे मतदारसंघातील मूलभूत सुविधांच्या विकासाबद्दल गावकरांचं वक्तव्य हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. आजगावकर पहिल्यांदा या मतदारसंघाचे आमदार बनले तेव्हाची या मतदारसंघाची परिस्थिती गावकरांना ठाऊक नाही आणि ती ठाऊक असणंही शक्य नाही. कारण गावकर तेव्हा दहाबारा वर्षांचे असतील. त्यांनी जाणत्या लोकांकडून या मतदारसंघाची स्थिती जाणून घ्यावी. म्हणजे आजगावकरांनी या मतदारसंघाचा कसा आणि किती विकास केलाय ते गावकरांना समजेल. राज्यातील या सर्वात मागास आणि उपेक्षित मतदारसंघाचा आजगावकरांनी अथक प्रायत्नाने सर्वांगिण विकास केला हरे सर्वज्ञात आहे,  असं गावस म्हणालेत.

हेही वाचाः १८ जून रोजी राज्यात गोवा क्रांती दिवस समारंभ

परस्परविरोधी विधानं करून गावकर करतात स्वतःचं हसं

मोपा विमानतळ बांधकाम ठिकाणच्या रोजगारासंबंधीचं त्यांचं वक्तव्यही असाच गोंधळ निर्माण करणारं आहे. मोपा विमानतळ प्रकल्पात स्थानिकांना रोजगार पुरवण्याबाबत ते शंका उपस्थित करतात आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मर्जीतील लोकांना रोजगार दिला असं वक्तव्य करतात. अशी परस्परविरोधी विधानं करून गावकर स्वतःचं हसं करून घेत आहेत, असं गावस म्हणालेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!