समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ‘त्या’ संशयिताला अटक

आदिवासी समाजबांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी गाकुवेधने केली होती पोलिसात तक्रार

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः समाजमाध्यमावर जातीवाचक आक्षेपार्ह टिप्पणी करून आदिवासी समाजबांधवांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संशयित सुदीप एम दळवी याला मंगळवारी फोंडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक करून संशयिताला फोंडा पोलिस स्टेशनवर आणण्यात आलंय.

हेही वाचाः पार्सेतील कांबळीवाड्यात नवीन नाल्याचे बांधकाम सुरू

नक्की काय आहे प्रकरण?

सुदीप दळवी याने गेल्या 4 तारखेला फेसबूकवर गावडा समाजाला काष्टीकार असं संबोधताना लुई फिलिप या कंपनीच्या महागड्या शर्टचे लिंक काष्टीशी लावले होते. समाजाबद्दल अन्य आक्षेपार्ह मजकूरही फेसबूकवर टाकण्यात आल्यानं या प्रकारामुळे कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांची बदनामी करण्याचं हे षडयंत्र असून या प्रकारामुळे गावडा समाजाच्या भावना दुखावल्याने राज्यातील शांतता भंग पाऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. या तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलिस महानिरीक्षक तसंच अन्य सर्व संबंधितांना देण्यात आली होती आणि संशयिताविरुद्ध त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश वेळीप यांनी केली होती.

गाकुवेधन संघटनेने सोमवारी केली पोलिसात तक्रार

दरम्यान संशयित सुदीप दळवी याने फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीची दखल घेत आदिवासी समाजाच्या गोकुवेध संघटनेने सोमवारी फोंडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. तसंच यापूर्वीही एसटी समाजबांधवावर जातीवाचक टिपणवणी केल्याचा घटनेचा उल्लेख संघटनेने आपल्या तक्रारीत नमूद केला. सदर संशयितांच्या फेसबुकवरीवल पोफाईलमध्ये डोकावल्यास अनेक युवतीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचं आढळतं. त्यानंतर माफीनामा सादर करून प्रकरण मिटवण्याचे प्रकार संशयिताने यापूर्वी केल्याची माहिती प्राप्त झाली.

उठा संघटनेनेही दाखल केली होती तक्रार

दरम्यान उठा संघटनेनेसुद्धा संशयित सुदीप दळवीच्या विरोधात याच प्रकारावरून तक्रार दाखल केली होती. उठा संघटनेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार कारवाई करताना रविवार 6 रोजी रात्री फोडा पोलिसांनी संशयिताविरुद्ध माहिती तंत्रज्ञानाच्या (66), भा.दं.सं. 295 कलमाखाली व अनुसुचित जाती आणि जमातीच्या अट्रोसिटी कलमाखाली गुन्हा नोंद केला.

हेही वाचाः सुनील छेत्रीने मोडला लिओनेल मेस्सीचा रेकॉर्ड

दरम्यान संशयिताच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारावर मंगळवारी फोंडा पोलिसांनी उपअधिक्षक नेल्सन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित सुदीप दळवीला ताब्यात घेतलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!