‘त्या’ चिमुकलीला मिळाली ‘अपना घर’ची सावली

५ एप्रिलची साखळीतील घटना; साखळीतील मल्टिपर्पज हॉलच्या मागच्या बाजूला आढळलं होतं जिवंत अर्भक

Goan Varta Live | प्रतिनिधी

साखळीः अगदी जेमतेम एक दिवस वय असणारी चिमुकली साखळमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडली. तिच्या आवाजाने समाजातील माणुसकीला पाझर फोडलाय. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू विभागात उपचार घेतल्यानंतर तिला आता अपना घरमध्ये नेलंय. मात्र, या चिमुकलीने गोमेकॉतील कर्मचाऱ्यांसह अपना घरमधील सर्वांनाच जीव लावलाय. दै. पुढारीने याचं वृत्त छापून आणलंय. त्या चिमुकलीला सर्वजण ‘गो माझी बाय’ म्हणून बोलवतात, तेव्हा ती खुदकन हसते.

हेही वाचा – Special report | Sand Issue | भरदिवसा तलवारी हातात घेऊन दहशत माजवणाऱ्यांवर कुणाचा वरदहस्त?

बाळ दत्तक घेण्यासाठी सारा पोर्टलवर नोंदणी

या चिमुकलीला दत्तक घेण्यासाठी अनेकांनी इच्छा दर्शविलीये. मात्र, दत्तक देण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि केंद्रीय महिला आणि बाल कल्याण खात्याने घालून दिलेल्या नियमाप्रमाणेच असते. यासाठी स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी (सारा) पोर्टलवर नोंदणी करावी लागते. येथे पालकांची माहिती वेगवगेळ्या पद्धतीने घेतली जाते. त्याचे अहवाल सादर केले जातात आणि मग पालकांना बाळ दत्तक द्यायचं की नाही हे ठरतं. इथेही बाळ कसं असायला हवं, यासाठीची इच्छा नोंदवता येते. मात्र हेच बाळ हवं असा अट्टाहास करता येत नसल्याची माहिती गोवा महिला आणि बाल कल्याण खात्यातून मिळालीये. डिचोली पोलिस या प्रकरणात तपास करून आईबाबांना शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलिसांकडे तसंच गोमेकांत अनेक पालकांनी भेट देऊन बाळ दत्तक घेण्याची इच्छा दर्शविलीये.

हेही वाचा – SAND | गोव्यातील रेती व्यावसायिकांनी महाराष्ट्राची रेती अडवली

बाळ रस्त्यावर फेकणं हा गुन्हा – आवदा व्हीएगस, समाजसेविका

मडगाव येथील बायलांचो एकवट संस्थेच्या समाजसेविका आवदा व्हीएगस म्हणाल्या, लोक बाळाला घेण्यासाठी पुढे येतायत; ही बाब चांगली असली तरी यासाठी एक प्रक्रिया आहे. ती होणं अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी अशी लहान मुलं टाकलेली पाहायला मिळाली. लोकांनी या प्रकारविरोधात आता आंदोलन करायला हवं. बाळ जन्माला घालून असं रस्त्यावर फेकणं हा गुन्हा असून हा प्रकार आता थांबायला हवा.

हेही वाचा – गुंडगिरी संपवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

नक्की काय आहे प्रकार?

व्हिडिओ पहाण्यासाठी 👇🏻 क्लिक करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!