मुख्यमंत्र्यांनी मानले फोमेंतो रिसोर्सेस ग्रुपचे आभार

फोमेंतो रिसोर्सेस ग्रुपकडून 'जीएमसी'ला 75 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोणत्याही सामाजिक अथवा नैसर्गिक आपत्तीत नेहमीच भरीव मदत करण्याऱ्या गोव्यातील प्रसिद्ध फोमेंतो रिसोर्सेस ग्रुपनं कोविडविरोधातल्या लढ्यासाठीही मोठी मदत केली आहे. सध्या ऑक्सिजनचा होणारा तुटवडा लक्षात घेता फोमेंतो रिसोर्सेसनं 75 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स जीएमसीला दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करून फोमेंतो रिसोर्सेस ग्रुपचे आभार मानलेत.

हेही वाचाः 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये होणार दाखल

मुख्यमंत्र्यांचं ट्विट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करताना म्हटलंय, फोमेंतो रिसोर्सेस ग्रुपने त्यांच्या सीएसआर फंडातून 75 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स जीएमसीला देऊन मोठी मदत केली आहे. फोमेंतो ग्रुपच्या या मदतीमुळे कोविडविरोधातल्या राज्याच्या लढ्याला ताकद मिळाली आहे.

फोमेंतो ग्रुपकडून गोवा तसंच सिंधुदुर्गात लॉकडाऊनमध्ये अन्नदान

कोविडची साथ देशात आल्यावर गेल्या वर्षी याच दिवसात देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं होतं. सर्व उद्योग, रोजगाराची साधनं अचानक बंद झाल्यामुळे देशावर आणि पर्यायाने राज्यावर मोठं संकट आलं होतं. अनेक परप्रांतीय कामगार आणि कष्टकऱ्यांची उपासमार होत होती. त्यामुळे फोमेंतो समुहाने खास यंत्रणा उभारून गोवा तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्नदान केलं होतं. अनेक गरजु कामगारांनी त्यांचा लाभ घेतला होता. याही वेळेस फोमेंतो समुहाच्या वतीने 75 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स जीएमसीला देण्यात आले आहेत. दरम्यान, यामुळे निश्चितच आरोग्य यंत्रणेची ताकद वाढली आहे. म्हणूनच कोविडविरोधातल्या राज्याच्या लढ्याला बळ मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!