भयानक | कॅसलरॉक रेल्वेजवळील धक्कादायक घटना

रेल्वेखाली येऊन अस्वलाचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कर्नाटकातील कॅसलरॉक येथे बुधवारी एक भयानक घटना घडलीये. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कॅसलरॉक येथे एक अस्वल रेल्वेखाली येऊन होत्याचं नव्हतं झालंय….

हेही वाचाः दुर्दैवी | मदतीसाठी गव्याने अखेरपर्यंत केली धडपड

नक्की काय झालं?

बुधवारी कर्नाटकातील कॅसलरॉक येथील रेल्वेट्रॅकवर एक ह्रदयद्रावक घटना घडली. कर्नाटकातील कॅसलरॉकजवळील दुधसागर धबधब्यानंतर असणाऱ्या बोगद्यात असलेले एक अस्वल रेल्वेखाली आले. या अपघातात या अस्वलाचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती प्राणी बचाव पथकचे प्रमुख अमृत सिंह यांनी दिलीये. बोगद्यात बसलेलं अस्वल ट्रेनला दिसलं नाही आणि त्यामुळे हा अपघात घडला असल्याचं सांगण्यात आलंय.

हेही वाचाः चित्तथरारक! बाईक, बिबट्या आणि लक्षवेधी फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

अमृत सिंह म्हणाले….

अस्वल रेल्वेखाली येऊन मृत पावल्याची माहिती सर्वप्रथम तेथील स्थानिकांना समजली. त्यानंतर लोकांनी कर्नाटकातील वनरक्षकाला सावध केलं आणि त्यांनी मला कळवलं. कर्नाटक आणि गोवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अस्वलाचा मृतदेह ताब्यात घेतलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!