ACCIDENT | ओपा रोड-खांडेपारमध्ये भीषण अपघात

30 टन बॉक्साईट भरलेल्या ट्रकची हॉलेटलला धडक; ट्रक न्यूट्रल झाल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटलं

Goan Varta Live | प्रतिनिधी


ब्युरो रिपोर्टः ओपा रोड-खांडेपार इथं एक भीषण अपघात घडला. 30 टन बॉक्साईट घेऊन जाणार्‍या ट्रकनं एका हॉलेटलला धडक दिली. सुदैवानं यात प्राणहानी झाली नसली, तरी हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

प्राणहानी टळली

शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास ओपा रोड-खांडेपार इथून एक ट्रक 30 टन बॉक्साईट घेऊन जात होता. अचानक ट्रक न्यूट्रल झाला आणि चालकाचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे ट्रकनं अनंत आश्रम या हॉलेटलला धडक दिली. सुदैवानं यावेळी हॉटेलमध्ये कोणी नव्हते. त्यामुळे प्राणहानी टळली. मात्र हॉटेलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

हॉटेलचा 80 टक्के भाग कोसळून जमीनदोस्त

हॉटेलचा 80 टक्के भाग कोसळून ते जमीनदोस्त झालं. ट्रकच्या धडकेमुळे हॉटेलसमोर उभ्या करून ठेवलेल्या दोन दुचाकींचंही नुकसान झालं. या प्रकाराबाबत स्थानिकांनी संताप व्यक्त केला. मायनिंग बंद असतानाही ही वाहतूक कशी काय होते, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला असून ट्रक मालकानं हॉटेलमालकाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!