भीषण! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बस उलटली

चौघांचा मृत्यू, ३० प्रवासी जखमी, १० जणांची प्रकृती गंभीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. कणकवली येथे खासगी बस उलटून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर, ३० प्रवासी जखमी झाले असून १० जणांची प्रकृती गंभीर आहे.

कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला अपघात झाला. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचाः FIRE | पिळर्ण येथील बर्जर बेकर पेंट कंपनीत अग्नितांडव

३० जण जखमी, दहा जणांची प्रकृती गंभीर

पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी महामार्गावर हळवल फाटा येथे हा अपघात झाला. या अपघातात ३० जण जखमी झाले असून दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालय व खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. बस मध्ये एकूण ३७ प्रवासी होते.
या अपघातात शैलजा प्रेमानंद माजी (५६ दोडामार्ग) व अण्णा गोविंद नाले (५२ सातारा) अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास अपघात

पुण्याहून गोव्याकडे जाणारी सदरची खासगी बस गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हळवल फाटा येथे आली असता चालकाचा ताबा सुटून खासगी बस पलटी झाली. अपघाताची खबर मिळताच स्थानिक नागरिक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती बर्गे, पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील, किरण मेथे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लागलीच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरू करण्यात आली असून त्यातील दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली शहरानजीक असलेल्या हळवल फाटा येथे तीव्र वळण आहे. या वळणावर यापूर्वी सातत्याने अपघात झाले आहेत. कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज ज्या ठिकाणी ते संपते त्या ठिकाणी गड नदीवरील पूलानंतर अचानक हे वळण समोर येते. वेगात असलेले वाहन या ठिकाणी चालकाला आवरता येत नाही आणि अपघात घडतात. गेल्या काही महिन्यात सुमारे पाच ते सहा मोठी वाहने या ठिकाणी अपघातग्रस्त झाली आहेत. आतापर्यंत अनेक जणांना या ठिकाणी जीव गमवावा लागला आहे. आज झालेला अपघात देखील अशाच प्रकारे धडकली आहे. वेगात असलेली बस या ठिकाणी आल्यानंतर चालकाचा बस वरील ताबा सुटला आणि ही खाजगी बस पलटी झाली.

हेही वाचाः Oscars 2023 | तब्बल पाच भारतीय सिनेमांचे ऑस्करसाठी नॉमिनेशन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!