शिवजयंतीच्या दिवशी कळंगुटमध्ये तणाव, मिरवणुकीवरुन वाद?

प्रशासनाने मिरवणुकीस परवानगी नाकारल्याने शिवप्रेमींनी नोंदवला निषेध

Goan Varta Live | प्रतिनिधी

कळंगुटः शिवजयंती निमित्त कळंगुट येथे मिरवणूक काढण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

मिरवणुकीस परवानगी नाकारल्याने तणाव

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यासाठी तयारी केली होती. त्यासाठी असंख्य शिवप्रेमी येथील श्री शांतादुर्गा मंदिराजवळ एकत्रित झाले होते. पण त्याचवेळी कळंगुटचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी परवानगी नाकारल्याचं पत्र समितीला सादर केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.

हेही वाचाः आजच्या महत्त्वाच्या 25 बातम्या…

शिवप्रेमींनी नोंदवला निषेध

मिरवणुकीमुळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करून परवानगी नाकारण्यात आली होती. यावेळी मामलेदार लक्ष्मीकांत कुट्टीकर तसंच पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. परवानगी नाकारल्याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवप्रेमींनी घोषणा दिल्या. तसंच शिवाजी महाराजांचा जयजयकार केला. या प्रकाराचा अध्यक्ष गुरुदास शिरोडकर यांनी निषेध केला. निरीक्षकांनी मिरवणुकीसंबंधी नकारात्मक अहवाल दिल्याने हा प्रकार घडल्याचं ते म्हणाले. यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नसल्याने सरकारच्या कृतीचा व प्रशासनाचा आपण तीव्र निषेध करतो, असं ते म्हणाले. परवानगी नाकारण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली.

हेही वाचाः बंदर प्राधिकरण कायदा अधिसूचित

पायी मिरवणुक काढली

मिरवणुकीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने काही काळासाठी शिवप्रेमींमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. काही काळाच्या चर्चेनंतर शेवटी मिरवणुकीसाठी वाहनांचा वापर न करता वाजत गाजत व जयघोष करत शिवप्रेमींनी पायी मिरवणूक काढली.

हेही वाचाः नगरपालिका निवडणूक अवमान याचिका निकाली

मुख्यमंत्री म्हणाले…

कळंगुटला शिवप्रेमींची मिरवणूक पोलिसांकडून का थांबवली गेली ते सध्या मला ठाऊक नाही. मी चौकशी करून घेईन व मग बोलेन असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हेही वाचा –

आजच्या महत्त्वाच्या 25 बातम्या…

नगरपालिका निवडणूक अवमान याचिका निकाली

CA ते IAS प्रवास करणाऱ्या दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रूचिका कत्याल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!