Goa Teacher Recruitment : रजेवरील शिक्षकांच्या जागी आता कंत्राटी शिक्षक, अशी असेल शिक्षक भरती प्रक्रिया…

८८ कंत्राटी शिक्षकांची भरती : नोव्हेंबरमध्ये होणार थेट मुलाखत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये ८८ कंत्राटी शिक्षकांची भरती केली जाणार आहे. या जागा रजेवर गेलेल्या शिक्षकांच्या जागी पर्यायी व्यवस्था म्हणून भरल्या जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या ७, ८ व ९ तारखेला मुलाखती होणार आहेत. याबाबतचे परिपत्रक शिक्षण विभागाने जारी केले आहे.
हेही वाचाःगांजा पोलीस स्थानकात आलाच नाही, गहाळ गांजाचा शोध सुरू…

उमेदवारांनी शिक्षण संचालकांच्या नावे करावा अर्ज

७ नोव्हेंबर रोजी काणकोणात ५, धारबांदोड्यात ९, बार्देशात १२, डिचोलीत ६ जागांसाठी मुलखती होतील. ८ तारखेला केपेत ८, मुरगावात १, पेडणेत ५, फोंड्यात १२ जागांसाठी मुलाखती होतील. ९ तारखेला सासष्टीत ७, सांगेत ३, सत्तरीत १० व तिसवाडीत १० जागांसाठी मुलाखती होणार आहेत. इच्छूक उमेदवारांनी शिक्षण संचालकांच्या नावे अर्ज करावयाचा आहे. पर्वरी येथील शिक्षण संचालनालयाच्या कार्यालयात सकाळी ९.३० ते १०.०० या वेळेत तर दुपारी २.०० ते २.३० या वेळेत अर्ज जमा करण्यास विभागाकडून सांगण्यात आले आहे. सकाळी १० नंतर व दुपारी २.३० नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे परिपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचाःGoa Crime News : वास्कोत आढळलं ‘नवजात अर्भक’…

उमेदवारांना दरमहा ३९,०१५ रु. मानधन दिले जाणार

उमेदवाराने एचएससी प्रणमपत्रासोबत डीएड पदविका किंवा पदवीचे शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय ४५ वर्षांच्या आत असणे बंधनकारक आहे. उमेदवारास कोंकणी व मराठी या दोन्ही भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३९,०१५ रु. मानधन दिले जाईल. एखाद्या निवड झालेल्या उमेदवाराने मध्येच काम सोडले तर त्याचे मानधन जप्त करण्यात येईल, असेही परिपत्रकात म्हटले आहे.अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, जन्म प्रमाणपत्र, पत्ता, १५ वर्षे गोव्याचे रहिवासी असल्याचा पुरावा, बायोडाटा व रोजगार नोंदणी प्रमाणपत्र या सर्व कागदपत्रांची एक प्रत जोडावी लागणार आहे. 
हेही वाचाःगोव्याला आणखी २५० इलेक्ट्रिक बसेसची भेट…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!