शिक्षकांनी आपलं ज्ञान अद्ययावत करणं गरजेचं

ज्येष्ठ साहित्यिक आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांचं प्रतिपादन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः शिक्षकांनी मुलांना ज्ञान देण्याच्या नवीन पद्धती अंमलात आणल्या पाहिजेत. आजची मुलं नवनविन गोष्टी लगेचच आत्मसात करतात. त्यामुळे शिक्षकांनी आपलं ज्ञान अद्ययावत करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांनी केलं. अखिल गोवा मराठी माध्यमिक शिक्षक महासंघ गोवातर्फे निवृत मराठी अध्यापक आणि आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते.

हेही वाचाः मांद्रे मनोरंजन सिटीला आमचा विरोधच !

संघटीत राहून कार्य करा

या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष गोपाळ सावंत यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि निवृत्त शिक्षक अरविंद सायनेकर, उपाध्यक्षा वेदश्री पित्रे, प्रिया टांकसाळी, खजिनदार राजमोहन शेट्ये, सदस्य प्रशांत मांद्रेकर, विजयशेट मांद्रेकर उपस्थित होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोपाळ सावंत यांनी महासंघाच्या सर्व सदस्याना संघटीत राहून कार्य करण्याचं आवाहन केलं.

हेही वाचाः ‘चक दे इंडिया’! भारतीय महिलांची ऑस्ट्रेलियाला पराभूत करत उपांत्यफेरीत धडक

निवृत्त शिक्षकांचा सत्कार

यावेळी अरविंद सायनेकर, दयानंद नाईक, अनिल बोंद्रे, अरुणा दिलखुश शेट, संगीता नाईक या निवृत्त शिक्षकांचा तसंच सन् २०१९-२० चा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक गोपाळ सावंत, सुदेश वझे यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प आणि स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला.

हेही वाचाः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडताय?

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने आणि मान्यवराच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. स्वागत आणि प्रास्ताविक प्रशांत मांद्रेकर, प्रमुख अतिथींचा परीचय राजमोहन शेट्ये यांनी केला. सत्कारमूर्ती आणि गौरव मूर्तींच्या प्रदिर्घ सेवेची माहिती सभागृहाला अनुक्रमे विजय शेट मांद्रेकर, संदिप गावस, सचिन पिळर्णकर, सिमा बनकर, गौतमी गवस, वेदश्री पित्रे, श्रीनिवास पाटील यांनी करून दिला. गौतमी गावस आणि सिमा बनकर यांनी मान्यवरांना पुष्पे प्रदान केली. अनिल पिळर्णकर यांनी इतर बाबी हाताळल्या. सत्कार मूर्तींच्या वतीने अरविंद सायनेकर यांनी आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे ऋणनिर्देशन वेदश्री पित्रे, तर प्रिया टांकसाळी यांनी सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली.

हा व्हिडिओ पहाः Video | RG | ELECTION | ‘आरजी’ सुप्रिमो मनोज परबांची पोलिसांकडून सुटका

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!