ही टॅक्सी घेईल करोनापासून सुरक्षेची काळजी

दाबोळी विमानतळावर अँटीव्हायरल व्हेईकल कोटींग स्टेशन, मंत्री मॉविन गुदिन्होंच्या हस्ते शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः करोनापासून ग्राहकांचं रक्षण करण्यासाठी गोवा माईल्सनं (Goa Miles) आपल्या टॅक्सी दर तीस दिवसांनी सॅनिटायझ करण्याचा निर्णय घेतलाय. वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्होंनी (Mauvin Godinho) मंगळवारी दाबोळी (Dabolim Airport) विमानतळावर या केंद्राचा शुभारंभ केला.

करोनाच्या अनुषंगानं दाबोळी विमानतळावर विविध उपाय योजण्यात आलेय. यात आयुर्वेदिक काढा देण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. आता सॅनिटायझेशनमुळं प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटणं स्वाभाविक आहे. या ‘अँटीव्हायरल व्हेईकल कोटींग स्टेशन’च्या शुभारंभ सोहळ्याला गोवा माईल्सचे पराशर पै खोत, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक गगन मलिक उपस्थित होते.

काय म्हणाले मॉविन गुदिन्हो
राज्यात सरसकट टॅक्सींना परवाने देत राहिल्यास भविष्यात पार्किंगची समस्या निर्माण होईल. या अनुषंगानं राज्यातील टॅक्सींचे ऑडिट करण्याचे निर्देश वाहतूक संचालकांना दिल्याचं वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले. दाबोळी विमानतळ सर्व सुविधांनी युक्त आहे, असा दावा करून एकतरी उणिवा दाखवा, असं आव्हान त्यांनी दिलं. दाबोळी विमानतळ बंद होईल, अशी भीती काहीजण दाखवत आहे. पण या विमानतळावर सरकारनं 450 कोटी रूपये खर्च केला हे कुणीही सांगत नाहीए. गोव्यात पर्यटक आल्यास पर्यटन उद्योगाला चालना मिळेल आणि त्यासाठी पर्यटकांची सुरक्षा हा तेवढाच महत्वाचा विषय असल्याच त्यांनी नमूद केलं. डिसेंबरपर्यंत पर्यटकांचा ओघ सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्राहक हाच केंद्रबिंदू ठेऊन गोवा माईल्स आपली सेवा देत आहे. पर्यटकांची अर्थात ग्राहकांची सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात येईल, अशी हमी गोवा माईल्सचे पराशर पै खोत यांनी दिली.

हेही वाचा
आपला गोवा बेस्ट डेस्टिनेशनमध्ये 11व्या स्थानी, थोडक्यात टॉप टेन हुकलं
मोठी अटक! विलास मेथर हत्याप्रकरणी शैलेश शेट्टीला बेड्या

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!