तवडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; भूमीपुत्र शब्दाला केला विरोध

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो रिपोर्टः गेले काही दिवस भूमीपुत्र अधिकारणी विधेयकावरून राजकीय वातावरण बरंच तापलंय. या विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात येतोय. अशातच गोव्याचे माजी मंत्री तथा भाजपचे अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष रमेश तवडकर यांनी आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत भूमीपुत्र शब्दाला विरोध दर्शवलाय.
हेही वाचाः महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ; पूरग्रस्तांसाठी ११,५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी !
यावेळी तवडकरांसोबत अनुसूचित जाती आणि जमातीचे गणेश गावकर, भाजपच्या अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचे प्रमुख तसंच इतर 5-6 जणांचं शिष्टमंडळ होतं. 3 दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत जे भूमीपुत्र अधिकारणी विधेयक संमत करण्यात आलं, या विधेयकातील ‘भूमीपुत्र’ हा या विधेयकातून वगळण्यात यावा, अशी मागणी यावेळी तवडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्र्यांनी तवडकरांची मागणी मान्य करणार असल्याची हमी यावेळी दिलीये. ‘गोवन वार्ता लाईव्ह’टे सिनिअर रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी याविषयी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अधिक माहिती दिली आहे.