‘तौक्ते’ धडकलं ! गोव्याला वादळी वा-याचा जोरदार तडाखा !

सकाळी आठनंतर वादळी वाऱ्यासह पावसानं धरला जोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी :…अखेर तौक्ते चक्रीवादळ गोवा आणि कोकणात आपला परिणाम दाखवू लागलंय. गोव्यात काल सायंकाळपासूनच समुद्रात मोठया लाटा उसळत होत्या. संपूर्ण गोवा आणि कोकण किनारपटटीवर समुद्राच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. मध्यरात्रीपासुन जोरदार वारे वाहत असुन वादळानं गोवेकरांची झोप उडवली. वा-याचा वेग हा ताशी 40 ते 60 इतका आहे. येत्या काही तासांत तो 100 ते 140 इतका होण्याचा अंदाज आहे. सध्या हे वादळ गोव्यापासून 100 किलोमीटरच्या जवळपास आहे. तिथुनच ते उत्तरेकडं म्हणजेच गुजरातकडं सरकरणार असल्याचं सांगण्यात येतंय.
तौक्ते वादळाला तोंड देण्यासाठी गोवा सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी कालच दिली होती. एनडीआरएफच्या तुकडयाही तैनात करण्यात आल्या आहेत. काल सायंकाळी समुद्रात मोठया लाटा येत होत्या. मध्यरात्रीनंतर जोरदार वारे वाहु लागले. या वायाचा वेग ताशी 40 ते 60 इतका होता. सोबत मध्यम स्वरूपाचा पाउसही पडतोय. सकाळी आठनंतर काही प्रमाणात वायाचा वेग कमी झाला. काही काळ वीजप्रवाह खंडीत झाला होता.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री पहाटेपासुन मैदानात
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत पहाटेपासून मैदानात आहेत. अधिकायांसोबत त्यांच्या बैठका आणि पाहणी सुरू आहे. कोकण किनारपटटीवरही मोठया लाटा आणि पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!