तरुण तेजपाल खटल्याचा अंतिम निवाडा आज, काय लागणार निकाल?

युक्तिवाद पूर्ण, आता प्रतीक्षा निकालाची!

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : तहलकाचे संस्थापक तरुण तेजपाल विरूध्दच्या खटल्याचा अंतिम निवाडा आज होण्याची शक्यता आहे. खरंतर १९ मे रोजी हा निवाडा दिला जाणार होता. मात्र वादलाचा फटका बसलेल्या वीज पुरवठ्यामुळे हा निवाडा पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, आज काय अंतिम निवाडा दिला जातो, हे पाहणं महत्त्वाचंय.

तोक्ते वादळामुळे म्हापशात वीज पुरवठा प्रभावीत झाला होता. त्यामुळे हा निवाडा पुढे ढकलावा, अशी मागणी वकिलांनी केली होती. त्यानुसार आता आज शुक्रवारी २१ मे रोजी दिला जाणार आहे. कोरोनामुळे नविन मार्गदर्शक सूचनांमुळे कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्यामुळे ही सुनावणी १२ मे रोजी तहकुब करण्यात येत असल्याचे न्यायाधीश क्षमा जोशी यांनी स्पष्ट केलं होतं. त्यासोबत १९ मे ही नवीन तारीख देण्यात आली होती. दरम्यान, आज होणारा निवाडा शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आला आणि तो २१ मे रोजी दिला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं.

युक्तिवाद पूर्ण

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. न्यायालयाकडून अंतिम निवाडा देण्याची तारीख गेल्या 27 एप्रिल रोजी देण्यात आली होती. पण त्यावेळी न्यायालयाने निवाड्याची सुनावणी तहकुब करून 12 मे रोजी सुनावणी निश्चित केली होती. बुधवारी 12 रोजी सुनावणीवेळी न्यायालयाने नवीन तारीख देत 19 मेपर्यंत अंतिम निवाडा तहकूब केला होता. दरम्यान, आता आज अंतिम निवाडा केला जाईल.

सध्या कोरोना महामारीच्या एसओपीमुळे न्यायालयात कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. न्यायालयाचे कामकाज फक्त 15 टक्के कर्मचार्‍यांच्या हजेरीत कार्यरत आहे. ही स्थिती खूप आव्हानात्मक असल्याने अंतिम निवाडा 19 मे रोजी सकाळी 10.30 अपेक्षित होता. निवाड्यातून आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे, असे अ‍ॅड.तावोरो म्हणाले होते. यासाठी दोन्ही पक्षाकडील वकील कोर्टात निवाड्यासाठी हजरही झाले होते. दरम्यान आज नेमका कोर्ट काय निकाल देतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

काय आहे प्रकरण?

तेहलका साप्ताहिकाचे मुख्य संपादक असलेले तरुण तेजपाल यांच्याविरोधात त्यांच्याच एका महिला सहकाऱ्याने लैंगिक अत्याचाराबाबत तक्रार दाखल केली होती. यावरून त्यांना 30 नोव्हेंबर 2013 रोजी अटक करण्यात आली. सध्या ते 1 जुलै 2014 पासून जामिनावर आहेत. गोव्यात एका कार्यक्रमाच्या वेळी ही घटना घडली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!