तानावडेंनी केलं सीतारमण यांच्या घोषणेचं स्वागत

अर्थसंकल्पात गोव्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांची तरतूद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी संसदेत आपला अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात गोव्यासाठी सुमारे 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गोवा सरकार यंदा गोवामुक्तीचा हीरक महोत्सवी वर्षं साजरं करत आहे. यानिमित्त संपूर्ण वर्षभर राज्यात विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या पार्शवभूमीवर अर्थमंत्र्यांनी गोव्याला 300 कोटी रुपये घोषित केल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या घोषणेचे स्वागत केलं आहे.

सदानंद शेट तानावडे म्हणाले…

अर्थमंत्र्यांनी कोविड 19 साठी तब्बल 35 हजार कोटी रुपयांची तरतूद करून सर्व सामान्यांना दिलासा दिला आहे. या अर्थसंकल्पात सामन्यातील सामान्य माणसाला दिलासा देण्याचा विचार केला आहे. तसंच 75 वय पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आयकर परतावयामध्ये सूट दिल्यानं पेन्शन धारकांना याचा मोठा लाभ होईल, असं श्री. तानावडे यांनी म्हटलं आहे.

6 सुत्रीवर आधारलेला अर्थसंकल्प

अर्थमंत्र्यांनी छोटे उद्योग, किरकोळ व्यापारी आणि स्टार्ट अप सुरू करणाऱ्यांसाठी मोठी तरतूद केली असल्याचं श्री. तानावडे म्हणाले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत निर्माण होईल. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ही अर्थमंत्र्यांनी मोठी तरतूद करून बळीराजाला दिलासा दिला आहे. आजचा अर्थसंकल्प आरोग्य सेवा – सुविधा निर्मिती, भांडवल उभारणी, पायाभूत सुविधांची उभारणी, संशोधन आणि विकास तसंच लोकाभिमुख प्रशासन या 6 सुत्रीवर तयार केल्याचं सदानंद शेट तानावडे यांनी म्हटलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!