आयआयटी प्रकल्प कोमुनिदादच्या जमिनीत न्या : गिरीश चोडणकर

सांगे येथे प्रकल्पासाठी जमीन अपुरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सांगे येथे होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पाला तेथील शेतक-यांचा विरोध होत आहे. राज्य सरकारने सांगे येथे पाहिलेली ७ लाख चौरस मिटर जमीन या प्रकल्पासाठी अपुरी असून त्यासाठी १२ लाख चौरस मिटर जमिनीची आवश्यकता असल्याने सरकारने हा वादग्रस्त प्रकल्प सांकवाळ येथील कोमुनिदादच्या जमिनीत न्यावा अशी मागणी माजी प्रदेश काॅंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचाःGoa Politics: मंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव…

कोमुनिदादची जागा सरकारने दिली होती भाडेपट्टीवर

सांकवाळ येथील कोमुनिदादची ५५ लाख चौरस मिटर जमीन १९६८ मध्ये एम/एस बिर्ला यांना सरकारने (लीज) भाडेपट्टीवर दिली होती आणि ज्या कारणासाठी त्यांना ती देण्यात आली होती, सदर जमिनीची त्यांना आता गरज नाही. पण सध्या कोमुनिदादच्या या ५५ लाखांपैकी ५० लाख चौरस मिटर जमिनीसंदर्भात फार मोठा घोटाळा करण्याचा प्रयत्न चालला आहे. कोमुनिदादची ५० लाख चौरस मिटर जमीन विकण्याचा घाट घातला जात असून किमान ६ हजार कोटी रुपयांचा घोटाळा होणार आहे. किंमतीचा विचार केला असता, सध्याचा मार्केट दर सुमारे २०,००० प्रति चौरस मिटर आहे. किमान दर १२,०००/- रु. प्रति चौरस मिटर धरला तरी त्याची किंमत ६ हजार कोटी होते अशी माहिती चोडणकर यांनी दिली.
हेही वाचाःराय येथील अपघातात एक जखमी…

मुख्यमंत्र्यांनी जमीन घोटाळा होण्यापासून रोखावा

चोडणकर म्हणाले की, एक मजबूत लॉबी कोमुनिदादची ही जमीन विकण्याचा प्रयत्न करत असून त्यात अनेक स्थानिक राजकारण्यांच्या मदतीने अनेक बिल्डर आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्स गुंतलेले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही जमीन वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि सर्वात मोठा जमीन घोटाळा होण्यापासून रोखावा, असे धाडसी विधान चोडणकर यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या मध्यवर्ती असलेल्या जमिनीचे संरक्षण करून त्यातील काही भाग आयआयटी प्रकल्पासाठी सुपूर्द करावा आणि उर्वरित जमीन सरकारने आवश्यकतेनुसार वापरावी असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

कोमुनिदादच्या मालकीची ही जमीन २ पैसे प्रति चौरस मिटर या दराने एम् /एस् बिर्ला यांना भाडे तत्त्वावर देण्यात आली होती. ती आता २०,००० रु. चौरस मिटर दराने विकली जाण्याची भीती चोडणकर यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी जर या घोटाळ्यात सहभागी झाले तर हा गोव्यातील सर्वात मोठा घोटाळा ठरेल, असे ते म्हणाले.
हेही वाचाःप्रादेशिक भाषा संपू देऊ नका : प्रसून जोशी…

सरकारचा तक्रारीला प्रतिसाद नाही

ज्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला ते सांकवाळ येथील नारायण नाईक यांना पैशांची लाच तसेच धमक्या देऊन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आसा, तरीही त्यांनी न घाबरता हा घोटाळा उघडकीस आणला, त्यांच्या या प्रयत्नांचे चोडणकर यांनी कौतुक केले. जी व्यक्ती आमची जमीन वाचवण्यासाठी धडपडते आहे, त्यांनी कित्येक तक्रारी केल्या असून सरकार त्यांच्या तक्रारीला प्रतिसाद देत नाही अन् कारवाईही करत नाही, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, अशी नाराजीही चोडणकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचाःसेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्तनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!