सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकवण्यासाठी विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गृह खात्याला आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सेंट जासिंतो बेटावर स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकावण्यास नौदलाला स्थानिकांनी विरोध दर्शवल्यानं वातावरण चांगलंच पेटलंय. बेट ही आमच्या पूर्वजांची खासगी मालमत्ता आहे आणि नौदलानं त्यावर हक्क गाजवू नये, असं स्थानिकांनी म्हटलंय. त्यावर मु्ख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी या प्रकाराचा निषेध करत सेंट जेसिंतो बेटावर तिरंगा फडकवण्यासाठी विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश गृह खात्याला दिले आहेत.

मुुख्यमंत्र्यांकडूनही निषेध

सेंट जासिंतो बेटावर स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकावण्यास नौदलाला स्थानिकांनी विरोध दर्शवल्यानं वातावरण चांगलंच पेटलंय. दरम्यान, या सगळ्यावर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ही बाब दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यावर आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. सेंट जासिंतो बेटावरील काहींनी नौदलाला ध्वजारोहण करण्यास विरोध करणं हे दुर्दैवी आणि लज्जास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. याचा मी निषेध करतो आणि गोवा सरकार अशा गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही देतो, असंही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटलंय.

नेमका काय आहे वाद?

जुझे फिलिप डिसोझा यांनी सेंट जोसिता बेटावर येऊन नौदलाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिकांवर हक्क बजावणं योग्य नसल्याचं म्हटलंय. त्यांनी हक्क बजावणं योग्य नाही. दरवर्षी आम्ही स्वातंत्रदिन ध्वजारोहण करतोच. पण जबरदस्ती करुन स्वातंत्रदिन साजरा केला जाऊ शकत नाही, असं जुझे फिलिप डिसोझा यांनी म्हटलंय. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसोबत सहभागी होऊन ध्वजारोहणात सहभाग घ्यावा, असं जुझे फिलिप डिसोझा यांनी म्हटलंय.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | DENGUE | वास्को, दाबोळी, मुरगावमध्ये डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!