तडीपार करणाऱ्यांच्या यादीमध्ये 78 जणांची नावं, सर्वाधिक गुन्हेगार ‘या’ तालुक्यात

2018 पासून यादी कार्यवाही प्रलंबित

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यात गत महिन्यात भर रस्त्यात तलवारी घेऊन मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील असामाजिक तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची माहिती घेतली असता, गोवा पोलिसांनी २०१८ ते आतापर्यंत ७८ गुंडाची यादी तयार करून त्यांना तडीपार करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती समोर आली आहे.

कुणाकुणाची नावं?

राज्यात १६ फेब्रुवारी रोजी कुख्यात गुंड अन्वर शेख याच्यावर भर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास फातोर्डा आर्लेम सर्कलजवळ कोयता, तलवार, लोखंडी रॉड घेऊन पाठलाग करत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यावेळी अन्वरच्या पायावर गोळीही झाडण्यात आली होती. तर रेती वाहतुकीच्या प्रश्नावरून उद्भवलेल्या वादातून जलेश नाईक याने बुधवार, ५ रोजी भोम येथे तलवार घेऊन तलवारीच्या धाकावर स्थानिक पारंपरिक रेती व्यावसायिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर फोंडा पोलिसांनी जलेशला शुक्रवारी अटक केली होती. तर दोन दिवसांपूर्वीच दाबोळी येथील बार्ज व्यावसायिक प्रमोद देसाई यांच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवून त्यांना बांधून ठेवून दरोडा घालण्यात आला होता. या प्रकरणी वास्को पोलिसांनी सुनील मोरे, सूरज मारुती कांबळी आणि विशाल आहुजा या तिघा संशयितांना अटक केली आहे. तर टोळीचा सूत्रधार डॉ. संजय वर्मा याचा शोध जारी आहे.

हेही पाहा – SAND ARRESTED | जयलेश नाईकला फोंडा पोलिसांकडून अटक

अशा अनेक घटना राज्यात घडत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अट्टल गुन्हेगारांची माहिती घेतली असता, उत्तर गोव्यात २४ तर दक्षिण गोव्यात ५४ मिळून ७८ अट्टल गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठी पोलिसांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे यादी पाठवली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यात खून, बलात्कार, दरोडा, महिलांसंबंधीचे गुन्हे, गुन्हेगारी गटाचे सदस्य असणे किंवा विशेष पद्धतीने गुन्हे करणारे आणि दोन गुन्ह्याहून जास्त गुन्ह्यांत सहभाग असलेल्या गुन्हेगारांची पोलिस अट्टल गुन्हेगार म्हणून नोंद करतात. अशा गुंडाची यादी तयार करून त्यांना तडीपार करण्याची तरतूद कायद्यात आहेत. परंतु ही कारवाईची प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब लागत असल्यामुळे गुन्हेगारांवर याचा काहीच परिणाम होत नाहीत. त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच असतात.

तडीपार केलेले गुन्हेगार सहा महिने दुसऱ्या जिल्हा राहून कालावधी संपल्यानंतर पुन्हा सक्रिय होत असतात. अशा गुंडाना प्रतिबंधात्मक अटक करून नंतर हमीवर सोडण्यात येते. तसेच त्यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत ताकीद दिली जाते. त्याच्याकडून चांगल्या वागणुकीची हमी घेतली जाते.

तडीपार करण्यासाठी पाठवलेली यादी

सर्वाधिक म्हणजे ८ गुन्हेगारांची यादी मडगाव आणि फार्तोडा पोलिस स्थानकांतून पाठवण्यात आली आहे. कुंकळ्ळी आणि वेर्णा स्थानकांच्या हद्दीतील सात जणांची यादी पाठवण्यात आली आहे.

कुडचडे आणि कळंगुट पोलिस स्थानकांतू सहा जणांची यादी पाठवली आहे. त्यानंतर वास्को आणि पणजी पोलिस स्थानकाने प्रत्येकी पाच जणांची यादी पाठवली आहे.

जुने गोवा पोलिस स्थानकात ४, मायणा- कुडतरी, पेडणे आणि कोलवा येथील प्रत्येकी तीन, काणकोण आणि कुळे प्रत्येकी दोन गुन्हेगाऱ्यांची यादी पाठवली.

केपे, सांगे, मुरगाव, पर्वरी, साळगाव, म्हापसा, हणजुणे, वाळपई आणि आगशी पोलिस स्थानकाच्या परिसरातील प्रत्येकी एका गुन्हेगाराची यादी पाठवली आहे.

हेही पाहा – Super Exclusive Zenito Cardozo | झेनिटो कार्दोजचा भाजपला पाठींबा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!