पहिल्या दिवशी लक्षणे दुसऱ्या दिवशी मृत्यू

१८ सप्टेंबरला ताप आला, 19 सप्टेंबरला मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोविड महामारीने ३४ वर्षीय युवतीचा बळी घेतला आहे. या युवतीला कोविड व्यतिरिक्त इतर कोणताही आजार नव्हता. एकाच दिवसापूर्वी तिला कोविडची लक्षणं दिसली होती आणि दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला.

वेंगुर्ला-म्हापसा येथील युवती

ही युवती वेंगुला येथील होती आणि केवळ एकच दिवसापूर्वी तिला कोविडची लक्षणं आढळली होती आणि म्हणून चाचणी केली होती. चाचणी पॉझिटिव्ह आली आणि त्याच दिवशी तिचा मृत्यूही झाला. तिला गोमेकॉत दाखल करण्यात आलं होतं. या प्रकारामुळे गोमेकॉत ही खळबळ माजली असून डॉक्टरांनाही हा प्रकार धक्कादायक वाटत आहे. कारण या युवतीला कोणताही आजार नव्हता.

१८ सप्टेंबरला ताप आला, 19 सप्टेंबरला मृत्यू

अगदी एक दिवस अगोदर म्हणजे १८ सप्टेंबरला तिला ताप आला होता आणि खोकला ही येत होता. त्यामुळे तिला गोव्यात गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. १९ सप्टेंबरला तिचा गोमेकांत मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!