पणजीत शनिवारी ‘स्वाभिमान २०२३’

शनिवारी २५ मार्च रोजी कला अकादमी येथील दर्यासंगमावर सायंकाळी ६:१५ वाजता सुरू होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील पोलीस बांधवाना गेले तीन वर्षे राजश्री क्रिएशनतर्फे विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. यानिमित्त ‘स्वाभिमान’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षीचा ‘स्वाभिमान २०२३’ कार्यक्रम येत्या शनिवारी २५ मार्च रोजी कला अकादमी येथील दर्यासंगमावर सायंकाळी ६:१५ वाजता सुरू होणार आहे.

कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी पोलीस, होमगार्ड, सरकारी वकील व अग्निशमन दलातील एकूण ४५ जणांना पुरस्कृत केले जाणार आहे. यामध्ये ३० महिलांचा समावेश आहे, अशी माहिती मंत्री गावडे यांनी यावेळी दिली. पोलीस अधीक्षक (२), पोलीस उपाधीक्षक (४), पोलीस निरीक्षक (७), पोलीस उपनिरीक्षक (५), सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (५), हवालदार (५), पोलीस कॉन्स्टेबल (५), मुख्य कारकून (१) यासह समाजमित्र पुरस्कार उत्तर (१), समाजमित्र पुरस्कार दक्षिण (१) व लोकमान्य पुरस्कार (१) या पुरस्कारांनी पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना गौरविले जाणार आहे, असे गावडे यावेळी म्हणाले.

सांस्कृतिक कार्यक्रमांत अभिनेत्री विशाखा सुभेदार, अभिनेता पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे, आशिष पवार तसेच गायिका आनंदी जोशी सादरीकरण करणार आहेत. यासोबत गोमंतकीय कलाकारही विविध कलाविष्कार सादर करतील, असे गावडे यांनी सांगितले. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!