कवळेच्या शांतादुर्गा संस्थानच्या नावे संशयिताने लुबाडलं भाविकांना

भाविकांकडून घेतल्या देणग्या; उस्मानाबाद येथील संशयिताविरुद्ध फोंडा पोलिसांत तक्रार

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः कवळे येथील सुप्रसिद्ध श्री शांतादुर्गा संस्थानच्या नावे बनावट संकेतस्थळ तसंच बँक खातं उघडून महाराष्ट्रातील एका व्यक्तीने भाविकांची फसवणूक चालवल्याची तक्रार संस्थानचे अध्यक्ष त्रिलोकनाथ बोरकर यांनी शनिवारी फोंडा पोलिसांत दिली. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील संदीप वाघमारे नावाच्या व्यक्तीने संस्थानच्या नावे ०९०२८०००२२१ या क्रमांकावरून भाविकांकडून धनादेश, रोख रक्कम तसंच फोन पे अॅपवरून देणग्या स्वीकारल्या आहेत. त्यासाठी उस्मानाबाद (महाराष्ट्र) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ६२०९३५१७१७७ क्रमांकाचे बनावट खातंही उघडलं आहे.

हेही वाचाः CURFEW | कर्फ्यू 21 जूनपर्यंत वाढवला

देवस्थान कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही

श्री शांतादुर्गा संस्थानने महाराष्ट्रातील कोणाही व्यक्तीला अशाप्रकारे देणगी स्वीकारण्यासाठी नियुक्त केलेलं नाही. संदीप वाघमारे याने उघडलेल्या बनावट खात्यामार्फत संस्थानला कोणत्याही देणग्या तसंच अन्य वस्तू वा तत्सम लाभ देवस्थानने घेतलेला नाही. वाघमारे याने भाविकांकडून स्वीकारलेल्या देणग्यांसंदर्भात देवस्थान कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

फोंडा पोलिसांत तक्रार दाखल

संशयित व्यक्तीची चौकशी करताना त्याचं संभाषण संकलित केल्याचा पुरावा देतानाच कवळेच्या श्री शांतादुर्गा संस्थानचे नाव बदनाम केल्याप्रकरणी संशयितावर तक्रार दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बोरकर यांनी पोलिसांकडे केली आहे. शनिवारी फोंड्याचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांना दिलेल्या निवेदन वजा तक्रारीची प्रत रायबंदर येथील सायबर सेललाही पाठवण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!