संशयित सोलोमनचे उच्च न्यायालयात आव्हान

अमली पदार्थ प्रकरण; म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालायने जामीन फेटाळला

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: अमली पदार्थ तस्करी प्रकरणी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालायने उगोचुक्वू सोलोमन उबाबुको (नायजेरिया) नागरिकाचा जामीन फेटाळून लावला होता. या निवाडाला संशयिताने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिलं आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २५ रोजी होणार आहे.

हेही वाचाः कवळे अपघातातील दुचाकी चालकावर गुन्हा दाखल

7 मार्च रोजी टाकला होता छापा

मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने रविवार ७ मार्च २०२० रोजी माझलवाडो-आसगाव येथे छापा टाकून उगोचुक्वू सोलोमन उबाबुको (नायजेरिया) आणि वॅलेन्टाईन ईजेझिए उर्फ डॅव्हिड (काँगो) या दोघांना अटक केली होती. यातील सोलोमन या संशयिताने दाखल केलेल्या जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला, तर दुसऱ्या संशयित डॅव्हिड याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आले होते.

दोघांना केली होती अटक

या प्रकरणी एनसीबीने ७ मार्च २०२१ रोजी माझलवाडो – आसगाव येथे छापा टाकून उगोचुक्वू सोलोमन याच्यासह वॅलेन्टाईन ईजेझिए उर्फ डॅव्हिड (काँगो) या दोघांना प्रथम ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून पथकाने विविध कंपन्यांची सुमारे दहापेक्षा जास्त मोबाईल सीमकार्ड, ११ मोबाईलसह सीमकार्ड, बँकेची कार्ड व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडली आहेत. छाप्याच्या वेळी एनसीबीने दोन्ही संशयितांकडून एलएसडीचे ४१ ब्लॉट, २८ ग्रॅम चरस, २२ ग्रॅम कोकेन, १.१०० किलो गांजा, १६० ग्रॅम पांढरी पावडर, ५०० ग्रॅम निळ्या रंगाचा पावडर अमली पदार्थ साठा आणि १० हजार रुपयांची रोकड जप्त केले.

हेही वाचाः गिरी येथून 19 वर्षीय युवती बेपत्ता

अमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

त्यानंतर संशयितांच्या विरोधात अमली पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून रितसर अटक केली होती. त्यानंतर संशयिताना पोलिस कोठडीसाठी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघा संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी ठोठावली होती. त्याच दरम्यान संशयितांनी जामीन अर्ज दाखल केला. तो न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर दोघा संशयिताने म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणातील उगोचुक्वू सोलोमन याच्या जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. तर दुसऱा वॅलेन्टाईन ईजेझिए उर्फ डॅव्हिड या संशयिताला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचाः कोलवाळ कारागृहाचा जेल गार्ड निलंबीत

या निवाडाला संशयित सोलेमन याने खंडपीठात आव्हान दिले आहे.

हा व्हिडिओ पहाः BUFFALO | तीन म्हशींचा मृत्यू, एक जखमी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!