महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी संशयितास अटक

29 जुलैची घटना; कोलवाळ पोलिसांनी केली अटक

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: चोरीच्या उद्देशाने घरात शिरून तक्रारदार महिलेवर हल्ला करून तिला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी संशयितास अटक केली. दीपक सोलेमन (३५, रा. थिवी, मूळ : हुबळी) असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे.

हेही वाचाः मायडा नदीत आढळला मृतदेह

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २१ जुलै रोजी घडली. यावेळी संशयित घराची कवलं काढून घरात शिरला. चोरीच्या उद्देशाने संशयिताने प्रवेश केला आणि तक्रारदार टेरिझा पॉल (६७, रा. चिखली – बार्देश) यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या उजव्या खाद्याला गंभीर दखापत केली. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी संशयितावर भादंसंच्या कलम ४५२, ३९४ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

हेही वाचाः काही क्षणात कोसळला डोंगर

पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार परब तपास करीत आहेत.

हा व्हिडिओ पहाः Video | Rape | Crime | आणखी एका तरुणीवरील बलात्काराच्या घटनेनं खळबळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!