SSR CASE || सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक

हैदराबाद इथं एनसीबीनं घेतलं ताब्यात ; लवकरच आणणार मुंबईला !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण मिळतंय. एनसीबीनं त्याचा मित्र आणि रुममेट सिद्धार्थ पिठानीला अटक केलीय. त्याला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं. लवकरच त्याला मुंबईत आणणार असल्याची माहिती मिळत आहे. षडयंत्र रचल्याच्या आरोपावरुन सिद्धार्थला अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात सीबीआयही तपास करत होती. त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. सुशांतला आपला भाऊ शौविक चक्रवर्तीच्या मदतीेने ड्र्ग्स पुरवल्याचा आरोप तिच्यावर होता. या प्रकरणाला अनेक वळणं मिळत होती. या प्रकरणातून पुढे अनेक सेलिब्रिटींना तपासाला सामोरं जावं लागलं होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचला होता. त्याने हिंदी सिनेसृष्टीत काय पो छे, पीके, शुद्ध देसी रोमान्स, छिछोरे, धोनी अशा सिनेमांमधूनही काम केलं होतं. वर्षभरापूर्वी हे प्रकरण खूपच गाजलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!