आत्तापर्यंत गोव्याला 7.47 लाख लसींचा पुरवठा

केंद्राच्या लसीकरण विभागाने मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाला दिलं लसीकरणासंबंधी प्रतिज्ञापत्र

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा या सगळ्याचाच मोठा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारानं आधी कडक निर्बंध आणि त्यानंतर कर्फ्यूसारखे निर्णयही घेतले. दरम्यान, आता तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये हायकोर्टाने थेट सरकारला अ‍ॅक्शन प्लॅनच देण्याबाबतचे संकेत दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या लसीकरण विभागाने मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाला लसीकरणासंबंधी प्रतिज्ञापत्र दिलंय.

हेही वाचाः CORONA UPDATE | मोठा दिलासा! 44 दिवसांनंतर देशात कोरोनाग्रस्तांमध्ये निचांकी आकडे

काय म्हटलंय प्रतिज्ञापत्रात?

मुंबई हायकोर्टाला प्रतिज्ञापत्र सादर करत केंद्र सरकारच्या लसीकरण विभागाने सांगितलंय की केंद्र सरकारने राज्य/ केंद्रशासित प्रदेशांना तेथील आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाईन कामगार आणि 45 वर्षांवरील लोकांना प्राधान्य देत त्यांच्या सरासरी वापराच्या आधारे राज्य तसंच जिल्हास्तरीय लस स्टोअर्सना लसींचा पुरवठा केला आहे.

आत्तापर्यंत गोव्याला 7.47 लाख लसींचा पुरवठा

26 मे 2021 पर्यंत गोव्याला एकूण 7.47 लाख डोस देण्यात आले आहेत, त्यापैकी 4.97 लाख डोस वापरले गेले आहेत आणि सध्या राज्याकडे एकूण 2.50 लाख डोस उपलब्ध आहेत. योग्य आणि न्याय्य लस वितरण सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार आरोग्य सेवा कामगार, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षांवरील लोकांसाठी सरासरी वापराच्या आधारे गोव्याला विनामूल्य कोविड-19 लसींचा पुरवठा करत आहे. हा पुरवठा उत्पादक आणि सीडीएल क्लिअर केलेल्या डोसद्वारे लसीच्या मासिक उत्पादनावर आधारित आहे. भारत सरकार मुक्त पुरवठा अंतर्गत गोवा राज्यासाठी 1 जून 2021 ते 15 जून 2021 साठी एकूण 45,700 डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः कोविडविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं

एकूण 36,580 डोस उपलब्ध करून देण्याची शक्यता

1 मे 2021 पासून लिब्रलाईज्ड प्राईसिंग आणि एक्सलरेटेड नॅशनल कोविड – 19 व्हॅक्सिनेशन स्ट्रॅटर्जी अंतर्गत 18-44 वर्षे वयोगटातील राज्य सरकारच्या औद्योगिक आस्थापने, खासगी रुग्णालये आणि हॉस्पिटल्सद्वारे लसींच्या डोसेसचे प्रमाण खरेदी केले जाणार आहे. राज्यामार्फत थेट खरेदी अंतर्गत उपलब्ध डोस हे प्रो-राटा आधारावर राज्य-जनतेनुसार 18-44 वयोगटातील लोकसंख्येनुसार तयार केले गेले. जून 2021 महिन्यात गोव्यातील 18-44 वयोगटातील लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी थेट खरेदीच्या माध्यमातून एकूण 36,580 डोस उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!