महत्त्वाच्या 25 बातम्या…

बातम्यांचा वेगवान आढावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

‘टायगर’ हल्लाप्रकरणी दुसरा संशयित अटकेत

‘टायगर’ अन्वर शेख हल्लाप्रकरणी दुसर्‍या संशयिताला अटक, खारेबांदचा विपुल पट्टारी फातोर्डा पोलिसांच्या जाळ्यात, तर पहिला संशयित रिकी होर्णेकरला 5 दिवसांची पोलिस कोठडी.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, एकास अटक

बालिकेचं अपहरण आणि लैंगिक अत्याचारप्रकरणी पंकज कुमार दास याला बिहारमध्ये अटक, गोवा वेल्हातील गुन्ह्याप्रकरणी आगशी पोलिसांनी आवळल्या दास याच्या मुसक्या.

कॅसिनोंना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ

मांडवी नदीतील कॅसिनोंना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ, पर्यायी जागेची व्यवस्था न झाल्यानं सरकारकडून दिलासा, कॅसिनोंच्या स्थलांतराविषयी अद्याप निर्णय नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, 24 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, तर स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना नोकरी देण्याबाबतही महत्त्वाचा निर्णय, ओटीएस योजनेलाही मुदतवाढ.

बाबूश मॉन्सेरात यांना मंत्रिपद?

पणजीचे डॅशिंग आमदार बाबूश मॉन्सेरात यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नवी रणनिती आखण्याच्या तयारीत असल्याची चर्चा.

ओव्हरब्रीजच्या आडून भूसंपादन?

कासावलीतल्या रेल्वे ओव्हरब्रीजला आमदार एलिना साल्ढाणांचा विरोध, भूसंपादनाविरोधात साल्ढाणा आक्रमक, ओव्हरब्रीजच्या नावाखाली रेल्वे दुपदरीकरणासाठी जमीन न देण्यावर ठाम.

हाऊसिंग बोर्डाची घरं परवडणार?

राज्यात लवकरच 200 घरांसाठी लिलाव, गोवा हाऊसिंग बोर्डच्या सुभाष शिरोडकरांची माहिती, मात्र घरांच्या किमती परवडणार्‍या असणार का, याबाबत साशंकता.

रशियन तरुणाचा जीव वाचवला…

रशियन व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखलं, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांची कौतुकास्पद कामगिरी, मांद्रेत आत्महत्या करण्यासाठी इमारतीवर चढलेल्या तरुणाला खाली उतरवण्यात यश.

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

महाराष्ट्रातील कोरोना संसर्गात वाढ, पुन्हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता, 24 तासांत महाराष्ट्रात 4 हजार 787 नवे करोनाबाधित.

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यानं चिंता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, लॉकडाऊन हवं की थोड्या निर्बंधासह मोकळेपणानं राहायचं, हे जनतेने ठरवावं. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, लॉकडाउन हा शेवटचा पर्याय.

मास्क न घालणार्‍या जिल्हा परिषद अध्यक्षाला दंड

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांना जिल्हा प्रशासनानं ठोठावला 200 रुपयांचा दंड, मास्क न वापरल्यानं कारवाईचा बडगा, प्रशासनानं दिला नवा मास्क.

इंधन दरवाढीवर सेलिब्रिटी आता गप्प का?

यूपीएच्या काळात इंधन दरवाढीवर ट्विट करणारे सेलिब्रिटी गप्प का? महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल, अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह अनेक सेलिब्रिटींच्या मौनावर साधला निशाणा.

संजय राठोडांबाबत घाई नको : अजित पवार

पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाईची घाई नको, राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मत, आरोप सिद्ध होण्याआधीच राठोडांना संशयच्या भोवर्‍यात टाकणं अनुचित.

अश्विन पाचव्या क्रमांकावर

भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आयसीसी कसोटीच्या अष्टपैलू क्रमवारीत पाचव्या स्थानावर, फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानी कायम, जसप्रीत बुमराहनं गोलंदाजीत राखलं आठवं स्थान.

उमेश यादवचं टीम इंडियात पुनरागमन

इंग्लंडविरुद्ध शेवटच्या दोन कसोटींसाठी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा संघात समावेश, शार्दुल ठाकूर संघाबाहेर, विजयी संघ कायम ठेवण्याची शक्यता.

फाफ डू प्लेसिसची कसोटीतून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकन संघाचा फलंदाज फाफ डू प्लेसिसचा कसोटी क्रिकेटला रामराम, पाकिस्तान दौर्‍यात आफ्रिकेच्या पराभवामुळे डू प्लेसिस घेतला कसोटीतून निवृत्तीचा निर्णय.

वासिम जाफरप्रकरणी चौकशीचे आदेश

उत्तराखंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणार्‍या वासिम जाफरच्या चौकशीचे आदेश, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याकडून निर्देश, मुस्लीम क्रिकेटपटूला निवडीसाठी प्राधान्य देण्यासह ड्रेसिंगरूममध्ये मौलवींना नमाजासाठी निमंत्रण दिल्याचा आरोप.

टीम इंडियाची दुसर्‍या स्थानावर झेप

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकावर झेप, दुसर्‍या कसोटीत पराभाव झाल्यानं इंग्लंडची पहिल्या स्थानावरुन थेट चौथ्या क्रमांकावर घसरण.

घोड्याच्या मालकानं नाकारली सल्लूची ऑफर

फरीदकोट इथल्या ‘हॉर्स ब्रीडर्स’ स्पर्धेदरम्यान घोडा खरेदी करण्याची सलमान खानची ऑफर घोड्याच्या मालकानं नाकारली, परमवीर नावाच्या घोड्याची खरेदी करण्यासाठी सलमान होता इच्छुक, मात्र परमवीरच्या मालकानं दिला सलमानला नकार.

जया भादुरी लवकरच मराठी चित्रपटात

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन मराठीत करणार पदार्पण, दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंच्या चित्रपटातून उतरणार मराठी सिनेसृष्टीत, मार्चमध्ये सुरु होणार चित्रिकरण.

प्लास्टिक सर्जरीमुळं गमवावे लागले चित्रपट

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रानं प्लास्टिक सर्जरीमुळे दोन चित्रपट गमवावे लागल्याचा केला खुलासा, ‘अनफिनिश्ड’ पुस्तकातून दिला आठवणींना उजाळा, काही धक्कादायक नोंदींमुळे प्रियांकाच्या आयुष्यातील कटू-गोड आठवणी चाहत्यांसमोर.

पहिल्यांदाच महिलेला फाशी

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला देणार फाशी, उत्तर प्रदेशमधील मथुरा तुरुंगातल्या शबनमला लटकवणार फासावर, तुरुंग प्रशासनाने सुरु केली तयारी.

खलिस्तानींचा आंतरराष्ट्रीय कट?

शेतकरी नेत्यांची हत्या घडवून आणण्यासाठी खलिस्तान कमांडो फोर्सचा कट, भारतीय गुप्तचर यंत्रणांचा धक्कादायक खुलासा.

मुस्लिमांसाठी भारतच सुरक्षित देश

इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देश मुस्लिमांसाठी सुरक्षित, भाजप नेते शाहनवाज हुसैन यांचं वक्तव्य, असुरक्षित वाटणार्‍यांना संपर्क साधण्याचं आवाहन.

सोन्याच्या दरात घसरण

सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा घसरण, सोन्याचे दर 111 रुपयांनी घसरले, एक तोळा सोनं 46 हजार 788 रुपये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!