सुनील अरोरा गोव्याचे नवे राज्यपाल?

प्रशासनिक कामाचा मोठा अनुभव असलेले अधिकारी; अनेक महत्त्वाच्या पदांवर केलंय काम

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते. अरोरा हे 65 वर्षांचे असून सोमवारीच ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. सुनील अरोरा हे मूळचे पंजाबचे आहेत. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा आहे.

हेही वाचाः ट्रॅफिक झालं अन् डाव फसला

कोण आहे सुनील अरोरा?

सुनील अरोरा हे राजस्थान कॅडरचे 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 31 ऑगस्ट 2017 ला त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. राजस्थानमध्ये प्रशासनिक सेवेदरम्यान विविध जिल्ह्यातील नेमणुकीबरोबरच ते केंद्र सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण खात्यात सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजक मंत्रालयात सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे. अर्थ आणि वस्त्र मंत्रालय आणि योजना आयोगात विविध पदांवर त्यांनी कार्य केलेले आहे. 1993 ते 1998 पर्यंत ते राजस्थानच्या मुख्यंत्र्यांचे सचिव आणि 2005 ते 2008 मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होते.

हेही वाचाःअरेच्च्या हे काय? राम मंदिरासाठीच्या देणग्यांचे हजारो चेक झाले बाऊन्स!

शैक्षणिक पार्श्वभूमी

सुनील अरोरा यांचा जन्म 13 एप्रिल 1956 ला पंजाबच्या होशियारपुर येथे झाला आहे. सुरूवातीचे शिक्षण होशियारपूरमधील विद्या मंदिर स्कूल आणि दयानंद मॉडेल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर डीएव्ही कॉलेश होशियारपूरमधून पदवी घेतली. पंजाब यूनिवर्सिटीमधून त्यांनी एमए केल्यानंतर तेथेच इंग्रजी शिकवू लागले. त्यांचे वडील रेल्वेमध्ये कार्यरत होते. तर आई डीएव्ही कॉलेजमध्ये शिकवत असे.

हेही वाचाः Breaking | भारतात कोरोनाची त्सुनामी! तब्बल २ लाख ३४ हजार ६९२ नवे रुग्ण

प्रशासनिक कामाचा मोठा अनुभव

सखोल प्रशासकीय समज असलेल्या या अधिकाऱ्याला वेळोवेळी महत्त्वाची पदे मिळत राहिली. सुनील अरोरा यांच्याकडे प्रशासनिक कामाचा मोठा अनुभव आहे. आयएएस नोकरी करताना ते राजस्थानच्या धौलपूर, अलवर, नागौर आणि जोधपूर सारख्या जिल्ह्यात कार्यरत होते. त्यांनी राजस्थानच्या सूचना आणि जनसंपर्क, उद्योग आणि गुंतवणूक विभागात आपली सेवा दिली. ते 5 वर्ष इंडियन एअर लाइन्सचे अध्यक्ष आणि मुख्य संचालक देखील होते.

हेही वाचाः दोतोर बोलले; काळजी घ्या, स्वतःला सांभाळा !

सुनील अरोरा एप्रिल 2016 लाच निवृत्त झाले आहेत. मात्र त्यांची दूरदृष्टी आणि निवडणुकीच्या प्रकरणात त्यांची पकड यामुळे ते निवृत्तीनंतर देखील कार्यरत राहिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!