दक्षिण गोव्यात रविवारी बत्ती गुल

रविवार ११ एप्रिलला सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत वीज पुरवठा खंडित

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वीज खात्यातर्फे उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने दक्षिण गोव्यात रविवार ११ एप्रिलला सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणारेय. यात मुरगाव, सासष्टी, सांगे, केपे आणि काणकोण या तालुक्यांचा समावेश आहे. धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल आणि दाभाळ, शिगाव कुळे, मोले पंचायत परिसरात, फोंडा तालुक्यातील पंचवाडी पंचायत क्षेत्रात वीजपुरवठा होणार नाही.

वीज वाहिनीच्या दुरुस्तीचं काम

वरील दिवशी शेल्डे येथील २२० केव्ही सब स्टेशन वीज वाहिनीवर, कुंकळ्ळी २२० केव्ही सब स्टेशन वीज वाहिनीवर, वेर्णा येथील ११० केव्ही सब स्टेशन वीज वाहिनीवर तसंच मुख्य ३३/११ केव्हीच्या वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणारेय. याची येथील रहिवाशांनी नोंद घेऊन सहकार्य करावं, असं वीज खात्यातर्फे कळविण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!