रविवारी झालेल्या 24 कोरोना बळींमध्ये एका 25 वर्षीय तरुणाचाही समावेश

राज्यातील मृत्यूदराची चिंता कायम

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी– रविवारी राज्यात कोविडचे आणखीन २४ बळी गेले. धक्कादायक बाब म्हणजे यात म्हापशातील एका २५ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर राज्यातील एकूण बळींची संख्या हजारच्या पार गेलीय. रविवारी १७ जणांचा जीएमसीत तर ७ जणांचा दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालाय.

रविवारी ज्या २४ जणांना मरण आलय त्यातील ७ रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या २४ तासात मरण आलय तर सर्वांना कोविडची लक्षणं होती. मृत्यू पावलेल्या २५ वर्षांच्या म्हापश्याच्या तरुणाला गेल्या १० दिवसांपासून कोविडची लक्षण आढळली होती.

राज्यात सरकारी हॉस्पिटल्स ओव्हर फ्लो

राज्यातील सरकारी हॉस्पिटल्स ओव्हर फ्लो झालेत.राज्यात साधारण १ हजार रुग्ण क्रिटिकल आहेत. जीएमसीत ४०० रुग्ण, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ३९५ रुग्ण इएसआय हॉस्पिटलमध्ये १६० रुग्ण उपचार घेत आहेत. इएसआयमध्ये ५० खाटा तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात १०० खाटा वाढवणार असल्याची माहिती जीएमसीचे डीन शिवानंद बांदेकर यांनी दिलीय. जीएमसीच्या नव्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकमध्ये ३०० खाटा सुरु करणार आहेत.

रविवारचे आकडे काय सांगतात?

राज्यात विक्रमी रुग्णवाढीची रविवारी नोंद
24 तासांत तब्बल २ हजार 293 कोरोना रुग्णांची भर
राज्यात दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू
राज्यातील एकूण मृतांचा आकडा 1 हजारच्या पार
आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 1 हजार 17 बळी
राज्याचा रिकव्हरी रेट 81.02 टक्क्यांवर
गेल्या 24 तासांत 25 वर्षांच्या तरुणाचाही कोरोनानं बळी
24 तासांत 13 रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल
रविवारी 547 नवे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये
गेल्या 24 तासांत राज्यात जवळपास 6 हजार रुग्ण
मडगावनंतर कांदोळी, पर्वरीची रुग्णसंख्या हजारच्या पार
राज्याची सक्रिय रुग्णसंख्या 13 हजार 689वर
गेल्या 24 तासांत 658 रुग्ण बरे झाले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!