रविवार ठरला निवडणूक प्रचाराचा वार…

डिचोली तालुक्यातील ३९७ उमेदवार मतदारांच्या भेटीला

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : तालुक्यातील १७ पंचायत क्षेत्रांतील १२५ प्रभागांतून एकूण  ३९७ उमेदवार रिंगणात आहेत. अनेक माजी सरपंच, पंच रिंगणात आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवली  आहे.रविवारी बहुतेक उमेदवारांनी  वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला.  त्यामुळे रविवार  हा प्रचारासाठीचा प्रमुख दिवस ठरला. काही ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत गटागटाने  प्रचार करताना उमेदवार दिसून आले. 
हेही वाचा:निवडणूक प्रचारात आमदारांचाही सहभाग…

नातेवाइॅक, मित्र परिवार, पक्षीय कार्यकर्ते प्रचारात सहभागी    

काही उमेदवारांनी मतदारांना सरकारी नोकऱ्यांची आमिषे, विकासाची स्वप्ने दाखवली असून  प्रत्येक मतासाठी आग्रही राहताना दिसत आहेत. नातेवाइॅक, मित्र परिवार, पक्षीय कार्यकर्ते यांना प्रचारात सहभागी करून घेतले जात आहे. शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असून प्रत्येक वाड्यावरील वातावरण  ढवळून  निघणार  आहे. 
हेही वाचा:अपात्र लाभार्थ्यांकडून होणार किसान सन्मान निधीची वसुली…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!