धिंगाणा! SUNBURN होणार, तारीखही ठरली! कसं करायचं बुकींग? वाचा डिटेल्स

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
ब्युरो : राज्यात प्रसिद्ध असणारा सनबर्न फेस्टिवल यंदाही होणार आहे. प्रत्येक वर्षाच्या शेवटी होणारा सनबर्न फेस्टीवल यंदा कोरोनामुळे होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. अखेर हा फेस्टिवल होण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. किती तारखेपासून हा फेस्टिवल होणार आहे, वाचा सविस्तर..
कधी होणार?
सनबनर्नच्या अधिकृत फेसबूक पेजवरून सनबर्न होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारपासून या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे. 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर असा हा फेस्टिवल रंगणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलच्या बुकींगलाही सुरुवात होणार आहे.
पर्यटक वाढणार
सनबर्न फेस्टिवलसाठी परदेशातून अनेकजण येत असतात. त्यामुळे हा फेस्टिवल नेहमीच चर्चेत असतो. यंदाही या फेस्टिवलमुळे पर्यटकांची संख्या वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. मात्र या फेस्टिवलच्या निमित्तानं सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणंही तितकंच गरजेचं आहे. या सगळ्याची खबरदारी घेत अटी आणि शर्थींसह यंदाचा सनबर्न फेस्टिवल पार पडणार आहे.
या फेस्टिवलच्या निमित्तानं पर्यटकांची संख्या वाढले, असा अंदाज आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थचक्रालाही गती येईल, असं सांगितलं जातंय सोबतच पर्यटनाशी संबंधित व्यवसायांनाही फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष सनबर्न फेस्ट (sunburn-goa-2020) होणार की नाही, याकडे लागलं होतं.
कुठे करायचं बुकींग?
सनबर्नसाठी जर तुम्हाला यायचं असेल, तर त्याच्या बुकींगलाही सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी बुकमायशो या वेबसाईटवर तुम्हाला तिकीट काढता येऊ शकेल. महत्त्वाचं म्हणजे यावेळी लोकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य देण्यात आलंय. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.
Life always has a way of finding its way back up. It’s time to end the year 2020 on a high! We have thought long &…
Posted by SUNBURN Festival on Saturday, 31 October 2020
काय काय बंधनकारक?
-आरोग्य सेतू एप असायला हवा
-मर्यादित लोकांना प्रवेश मिळणार
-थर्मल स्कॅनिंग केलं जाणार
-सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य
-4 नोव्हेंबरपासून तिकीट विक्रीला सुरुवात
-व्हीआयपी आणि व्ही-व्हीआयपी तिकीटही उपलब्ध
काय असतं सनबर्नमध्ये?
थिरकणं, फिरकणं, खाणं, पिणं असं सगळंच या फेस्टिवल सुरु असतं. नाच-गाणं हे या फेस्टिवलचं प्रमुख केंद्र असतं. महत्त्वाचं म्हणजे या फेस्टिवलमध्ये ड्रग्सची विक्री होते, असाही नेहमी आरोप होतो. सनबर्न आणि वाद, नेहमीच चर्चेत असतात. यंदाही कोरोनामुळे सनबर्न फेस्टिवल गाजेल यात शंका नाही.
आजच (१ नोव्हेंबरला) फेस्टिवल कधी होणार याची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे लवकरच सनबर्नवरुन काय वाद होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तोवर तुम्ही गेल्या वर्षीचा सनबर्न कसा होता, त्याचा व्हिडीओही पाहून घेऊ शकता.
हेही वाचा –
‘नो शर्ट फ्री बिअर’ ऑफर महिलांना देणारा बार भाजप कार्यकर्त्यांनी शोधला!
अजबच! ती चक्क दातांनी सोलते नारळ…