‘आप’च्या ‘प्रतिमा’ला पोलिसांकडून समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

समन्स घेण्यास प्रतिमांचा नकार; चौकशीसाठी हजर न राहिल्यास होणार अटकेची कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ‘आप’च्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांना नुवे केकवॉर प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांकडून शुक्रवारी समन्स बजावण्यात आलाय. मात्र कुतिन्हो यांनी घेण्यास दिला नकार दिला. प्रतिमा कुतिन्हो यांच्यावर मायणा कुडतरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसंच शनिवारी त्यांना या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी बोलावलं आहे. चौकशीसाठी पोलिस स्टेशनवर उपस्थित न राहिल्यास त्यांच्यावर अटकेची कारवाई शक्य असल्याचं समन्समध्ये स्पष्ट केलंय.

हेही वाचाः कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस सत्तेत येणार नाही!

काय आहे प्रकरण?

काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारलेल्या आमदारांच्या पक्षांतराची वर्षंपूर्ती साजरी करण्यासाठी आम आदमी पक्षाने (आप) 10 जुलै रोजी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. पक्ष बदलून भाजपात गेलेल्या आमदारांच्या घरी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केक पाठवले. याच उपक्रमांतर्गत नुवे येथे प्रतिमा कुतिन्हो यांनी ‘आप’च्या इतर कार्यकर्त्यांसह जमावाला एकत्र करत शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत संयुक्त मामलेदार रुजारिओ कार्व्हालो यांनी मायणा – कुडतरी पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

जुलै 2019 मध्ये भाजपमध्ये काँग्रेसच्या 10 आमदारांनी प्रवेश केला. 2019 पासून काँग्रेसचे सर्व 13 आमदार भाजपमध्ये दाखल झाले, तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आमदारही 2019 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!