जमीन हडप प्रकरण ; तंत्र सहाय्यकाला केरळमधून अटक…

पथकाने बुधवारी घेतले संशयिताला ताब्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : बनावट दस्तावेज बनवून जमिनी हडप प्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) अल्ताफ सी.ए. (३१, रा. कासारगोड-केरळ) या पाचव्या संशयितास अटक केली आहे. अल्ताफ हा एमबीए शिक्षित असून या प्रकरणातील मुख्य संशयित मोहम्मद सुहैल शफीला याचा तो तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करत होता.
हेही वाचा:महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही…

संशयिताला ठोठावली पोलीस कोठडी

संशयित सुहैलने चौकशीवेळी अल्ताफचे नाव उघड केले होते. त्यानुसार एसआयटीचे पथक मंगळवार, २८ रोजी केरळमध्ये रवाना झाले होते. कासारगोड येथे संशयित वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच विद्यानगर पोलिसांच्या सहाय्याने उपनिरीक्षक योगेश पाडलोस्कर, हवालदार इर्शाद वाटांगी व कॉन्स्टेबल महाबळेश्वर सावंत या पथकाने बुधवारी संशयिताला ताब्यात घेतले. त्याला गुरुवारी गोव्यात आणून रितसर अटक केली. संशयिताला म्हापसा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
हेही वाचा:मणिपूरमध्ये ५५ जवान ढिगाऱ्याखाली; ८ ठार!

बनावट कागदपत्रांनी बळकावत होते जमिनी

जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सुहैल हा अल्ताफला सर्वे क्रमांक तपासण्यासाठी सांगत. गुगलच्या सहाय्याने संशयित सरकारी संकेतस्थळावर जाऊन संबंधित जमिनीचा एक/चौदाचा उतार व इतर कागदपत्रे डाऊनलोड करून सुहैलला देत. नंतर तो पुरातत्त्व खात्याकडून ही कागदपत्रे बदलत व त्यानंतर तो बनावट कागदपत्रे बनवून जमिनी बळकावत होता. या कामासाठी सुहैल अल्ताफला भरीव मोबदला द्यायचा. नागवा-हडफडे येथे अल्ताफ यास भाड्याची खोलीमध्ये ठेवले व तेथूनच तो कागदपत्रे डाऊनलोड करून देण्याचे काम करत होता, अशी माहिती मिळाली आहे.
हेही वाचा:गोव्याला कौशल्य विकास संस्थांची गरज… ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!