सुदिपअण्णा बीए-एलएलबी! ताम्हणकरांचं आव्हान सरकार स्वीकारणार काय ?

ताम्हणकरांचं सरकारला ओपन चॅलेंज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मुन्नाभाय एमबीबीएस चित्रपट बराच गाजला. ह्याच चित्रपटातून नव्या पिढीला बापू कळले हा वेगळाच चमत्कार. पण असले मुन्ना, अण्णा, भाऊ, भाई आपल्या समाजात वेगवेगळ्या पात्रांत काम करत असतात. माणसाची किंमत ही त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून करायची नसते तर त्याचे ज्ञान, हुशारी आणि त्याच्या अकलेवरून करायची असते. आपल्या गोव्यातही अशीच एक व्यक्ती आहे. सुदिप ताम्हणकर असं नाव त्याचं. सुदिप अण्णा असं म्हणून काही लोक त्यांना ओळखतात. खाजगी बस मालक संघटनेचा सरचिटणीस म्हणून तो काम करतो.

पाहा व्हिडीओ – स्पेशल रिपोर्ट | टॅक्सी आंदोलनात विरोधकांची उडी, टॅक्सी चालकांनी खडसावलं

आरटीआय कार्यकर्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चक्क सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्याने आत्तापर्यंत सरकारला घाम काढलाय. त्याला सगळेच दचकून असतात. विशेष म्हणजे सुदिप ताम्हणकरांच्या पदराला सेंट झेवियर्स कॉलेजची बीएची पदवी आहे. आरटीआय अर्ज आणि वेगवेगळे खटले लढवून त्याने अप्रत्यक्ष एलएलबीच केल्याचे दिसून येते. आता ह्यात अण्णांने गोवा माईल्स आणि टॅक्सी मीटरांच्या विषयावरून सरकारला थेट आव्हान दिलंय.

खोटारडेपणा उघडा पाडू

गोवा माईल्स ऍप हा गोवा पर्यटन विकास महामंडळाने लागू केलाय. या ऍपच्या विरोधात राज्यातल्या टूरीस्ट टॅक्सीवाल्यांनी जोरदार आंदोलन छेडलंय. दरदिवशी टॅक्सीवाल्यांची मारामारी सुरू असते. हा ऍप बंद करा अशी एकमुखी मागणी टॅक्सीवाले करताहेत तर ऍप अजिबात बंद करणार नाही,असं सरकार सांगतंय. आता हा सगळा ऍपचा व्यवहार हा केवळ एका आमदाराला खूष करण्यासाठी केला गेल्याचा आरोप टॅक्सीवाले करताहेत. गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि वाहतूक खाते अशी दोन खाती ह्यात अडकलीत. पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी हा ऍप आणल्याचे सरकार सांगतेय तर या ऍपमुळे टॅक्सीवाल्यांच्या पोटावर लाथ मारल्याचा आरोप टॅक्सीवाले करताहेत. आता ताम्हणकरांनी नेमके वर्मावर बोट ठेवलंय. सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयएएस अधिकाऱ्यांची एक समिती नियुक्त करावी. या समितीला एक महिना किंवा पंधरवड्याची वेळ देऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचे टार्गेट द्यावे. या समितीसमोर टॅक्सी संघटना आपली बाजू मांडेल.

taxi 800X450

हेही वाचा – TAXI | टॅक्सीवाल्यांची मनमानी खपवून घेणार नाही! #Goa #Marathi #News

गोवा माईल्सबाबत आपला युक्तीवाद करेल आणि त्यासंबंधीचे पुरावेही सादर करेल. या समितीने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद एकून घ्यावे आणि आपला निर्णय सरकारला कळवावा. हा जो काही निर्णय होईल तो संघटनेला मान्य असेल,असे ताम्हणकर म्हणताहेत. या समितीसमोर गोवा माईल्सच्या सर्व बेकायदा व्यवहारांचा पोलखोल करू, असेही ते ठामपणे सांगताहेत. टॅक्सीवाले चर्चेसाठीच येत नाहीत,अशी तक्रार सरकार करीत आलंय. आता टॅक्सीवाल्यांच्यावतीने ताम्हणकर यांनी हे आव्हान दिलंय तर ते स्विकारण्याची धमक हे सरकार दाखवणार काय, हा महत्वाचा प्रश्न आहे.

हेही वाचा – Taxi Issue | Special Interview | खासगी टॅक्सीचालकांची भूमिका नेमकी काय आहे?

मीटर लावताय पण कोणत्या कायद्याखाली ?

राज्यातील टूरीस्ट टॅक्सींना मीटर लावण्यात यावेत अशी याचिका टीटीएजी या संघटनेने मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी राज्य सरकारच्या वाहतूक खात्यानेच लवकरच मीटर लावले जातील,असं प्रतिज्ञापत्रं सादर केलंय. यासाठी निविदा मागवल्याची माहितीही त्यांनी दिलीय. आता प्रश्न आहे की राज्यातील काळ्या- पिवळ्या आणि ऑल गोवा टूरीस्ट टॅक्सीवाल्यांना हे मीटर कायद्याने लागू होतात. त्यांनी ते लावलेत आणि ते व्यवस्थितपणे चालतात.

हेही वाचा – ‘गोवा माईल्स’विरोधात उद्रेक! टॅक्सीचालकाला हणजूणमध्ये बदडले

ऑल इंडिया टूरीस्ट टॅक्सीवाल्यांना मीटरची तरतुद कायद्यात नाही. हे सरकारला माहित आहे की नाही, ठाऊक नाही पण सरकारने मात्र हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलंय. सरकार मात्र सांगताना असे चित्र तयार करतंय की हायकोर्टाने टॅक्सींना मीटर लावण्याचे आदेश दिलेत. हे खरं नाही. सरकारनेच तसं आश्वासन हायकोर्टाला दिलंय. आता कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार हे टॅक्सी मीटर लावणार आहेत ते मात्र कुणालाच माहित नाही. ताम्हणकरांनी या दोन्ही विषयांवरून सरकारला चांगलेच कैचीत पडकलंय. आता सरकार याबाबतीत काय करतंय ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा – कोरोनाला अटकाव करत पर्यटन क्षेत्र सुरू राहणं गरजेचं

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!