दाबोळी विमानतळ टर्मिनलच्या बाहेर अचानक जमिनीतून आला धूर

भूमिगत इलेक्ट्रिक केबल जळाल्याने धूर; कर्मचाऱ्यांनी त्वरित मिळवलं नियंत्रण

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को: दाबोळी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या बाहेर जमिनीतून अचानक धूर येऊ लागल्याने काही वेळ गोंधळ उडाला. कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेत नियंत्रण मिळवलं. भूमिगत इलेक्ट्रिक केबल जळाल्याने हा धूर येत होता.

बुधवारी संध्याकाळची घटना

ही घटना बुधवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली. दाबोळी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित पावले उचलून काही मिनिटांत केबलला लागलेली आग विझवली. विमानतळाच्या आगमन गेट २ च्या बाहेर जमिनीतून अचानक धूर येत असल्याचे काही प्रवासी आणि इतरांनी पाहिले व त्वरित याची कल्पना विमानतळावरील कर्मचाऱ्यांना दिल्याने मोठी दुर्घटना घडली नाही.

चौकशी करणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग लागण्यामागचे कारण काय याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!