पोलिसांच्या जाचाला कंटाळून तिघांची आत्महत्या? सनसनाटी आरोपांनी पोलिसांवर सवाल

कथित चोरीच्या आरोपाखाली कुटुंबाचा पोलिसांकडून छळ?

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

मडगाव : एक धक्कादायक बातमी येते आहे झुआरीनगरमधून. पोलिसांच्या छळाला कंटाळून तिघांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला जातो आहे. कथित चोरीच्या आरोपाखाली एका महिलेच्या कुटुबांनं पोलिस छळाला वैतागून अखेर सामूहिक आत्महत्या केल्यानं झुआरीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलंय?

ही घटना मंगळवारी सकाळी घडल्याचं समोर येतंय. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास गळफसा लावून आत्महत्या करत तिघांनी आपलं आयुष्य संपवलंय. कथित चोरीचा गुन्हा नोंद न करता पोलिसांनी आत्महत्या केलेल्या तिघांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. या कारणामुळे कंटाळून आत्महत्या पाऊल या तिघांनी उचलल्याचं बोललं जातंय. या दाम्पत्याला आठ आणि दहा वर्षांच्या दोन मुली आहेत. कुटुंबातील सर्वांच्या मृत्यूमुळे आता या दोन्ही मुलांच्याही भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय.

हेही वाचा : केरी मारामारी प्रकरणी एकूण 22 जणांवर गुन्हे दाखल

झुआरीनगरनध्ये राहत असलेल्या हुलगप्प अंबिगेर, त्याची पत्नी देवम्मा अंबिगेर आणि गंगप्पा अंबिगेर अशी मृतांचा नावं आहेत. पती, पत्नी आणि लहान दिरानं एमईएस महाविद्यालयाजवळच्या अमन कॉलनीतील भाड्याच्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.

कशामुळे आणि का?

गेल्या १० वर्षांपासून हे कुटुंब गोव्यात राहत होता. कोविडनंतर १० दिवसांपूर्वी हे सर्वजण गोव्यात परतले होते. देवम्माचं वय २५ वर्ष असून हुलगप्पा यांचं वय ३० वर्ष आहे. ते दोघं पतीपत्नी आहेत. त्यांना दोन मुलीही आहेत. अमन कॉलनी इथं शमशुद्दीन खान यांच्या घरी गे कुटुंब भाड्यानं राहत होतं. देवम्मा ही याच भागातील एका ठिकाणी घरकाम करायची. त्याच घरातून काही हल्लीच महागातला ऐवज चोरीला गेला होता. दरम्यान, घरमालकानं देवम्मा हिच्यावर चोरीचा आळ घेऊन वेर्णा पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. या तिघांनाही पोलिस स्थानकात बोलून त्यांना मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा : Crime | NCB | Sameet Wawnkhede | NCB मुंबई आणि गोव्याच्या पथकाला मोठं यश

पोलिसांवर सनसनाटी आरोप

आत्महत्येच्या आदल्या दिवशी हुलदप्प याने फोन करुन पोलिसांनी जबर मारहाण केल्याचंही सांगितलं जातंय. मारहाणीमुळे नीटसं चालताही येत नसल्याचं त्यानं सांगितलं होतं. घरकाम करणाऱ्या देवम्माचा चोरी करतानाही व्हिडीओ आहे, असं म्हणत पोलिसांनी आरोप मान्य करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे या तिघांपैकी आत्महत्या करणारा २५ वर्षाय गंगप्पा याचा नुकताच विवाह झाला होता. गावात त्याची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, सनसनाटी आरोपांमुळे वेर्णा पोलिसांवरही अनेक सवाल उपस्थित झाले. त्यांची उत्तर कधी मिळणार, हाही प्रश्न कायमच आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!