कोविड पॉझिटिव्ह गरोदर महिलेचं यशस्वी सी-सेक्शन

मडगावातील मदर केअर हॉस्पिटलच्या तरुण डॉक्टर्सची यशस्वी कामगिरी; आई आणि बाळ सुरक्षित

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः मडगावातील मदर केअर हॉस्पिटलमधील तरुण डॉक्टरांच्या पथकाने कोविड पॉझिटिव्ह गर्भवती महिलेचं यशस्वी सी-सेक्शन केलं. मोठी जोखीम पत्करत डॉक्टर्सच्या पथकाने ही डिलिव्हरी केली. यासाठी या डॉक्टर्सच्या पथकाने त्यांचं धैर्य, व्यावसायिक बांधिलकी आणि कौशल्य पणाला लावलं. अशा प्रकारची रिस्क घेणाऱ्या मोजक्या खासगी हॉस्पिटल्सच्या यादीत मदर केअर हॉस्पिटलने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.

हेही वाचाः आरोग्य संचालनालयाकडून महत्त्वाचं पाऊल

महिलेवर कोविड उपचार करणं होतं अशक्य

मूळ पणजी येथील ही गर्भवती रुग्ण इतर ठिकाणी खाटांची कमतरता असल्यामुळे २८ एप्रिलला मडगावातील मदर केअर रुग्णालयात दाखल झाली होती. त्या महिलेला कोविडची लागण झाली होती. तिचे दिवस भरून डिलिव्हरीची तारीख जवळ आली होती. तसंच तिची आरोग्य अवस्था पाहता आणि बाळाला असलेला धोका लक्षात घेता तिचे कोविड उपचार सुरू करणं शक्य नव्हतं.

हेही वाचाः CORONA UPDATE | पर्वरीत कोरोनाचा हाहाकार

जोखीम पत्करत केलं सी-सेक्शन

जास्त वेळ वाया न घालवता सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सावनी हेगडे सुर्लकर यांनी गरोदर महिलेचं सी-सेक्शन करण्याचा निर्णय घेतला. डॉ. हेगडेंच्या नेतृत्वाखालील तरुण डॉक्टरांच्या पथकाने सी-सेक्शनची तयारी केली. कोविड पॉझिटिव्ह गरोदर महिलेला मध्यम स्वरुपाची कोविड न्यूमोनिया आणि सतत ताप असताना तिला सिझेरियन विभागात घेऊन तिचं सी-सेक्शन केलं.

हेही वाचाः CORONA |भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय

आई आणि बाळ सुखरूप

कोविड प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्यामुळे खाटांची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे आणि अशा गंभीर काळात जीएमसीमध्ये त्या महिलेला पाठवणं मूर्खपणाचं ठरलं असतं. अशा या कठीण प्रसंगी आई आणि बाळाला वाचवण्याचा निर्णय हॉस्पिटलमधील तरुण डॉक्टर्सच्या पथकाने घेतला. डिलिव्हरीनंतर आई आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. आईला कोविड पॉझिटिव्ह असल्याने तिला सध्या मदर केअर हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिन आणि पुलमोनोलॉजिस्टच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं असल्याचं स्टेटमेंट हॉस्पिटलकडून देण्यात आलंय.

हेही वाचाः COVID VACCINATION | डिचोलीत ९ सेंटर लसीकरणासाठी

तरुण डॉक्टर्स पथकाची यशस्वी कामगिरी

ही डिलिव्हरी यशस्वीपणे पार पाडण्यात सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सावनी हेगडे सुर्लकर यांना सल्लागार स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. नीरज बोरकर, सल्लागार भूलतज्ज्ञ डॉ. केफस क्वाड्रोस आणि ओटी सहाय्यक तीर्थनका नाईक यांचं सहकार्य लाभलं. सल्लागार रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रसाद हेगडे यांनी जन्माच्या वेळी बाळाच्या वजनाचा अंदाज खातरजमा केला तसंच बेड साइड अल्ट्रासाऊंड केल्यानंतर ही डिलिव्हरी करण्यात आली.

हेही वाचाः स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घ्या

आई आणि बाळाची ‘मदर केअर’ घेतंय काळजी

प्रसूतीनंतर रुग्णाची काळजी घेण्याचं काम कन्सल्टंट इंटर्नल मेडिसीन डॉ. अमन प्रभुगावकर आणि कोविड-19 च्या सल्लागार पुलमोनोलॉजिस्ट डॉ. जागृती नाडकर्णी करत आहेत. डॉक्टर्सच्या टीमला सतत पाठिंबा देणं तसंच अद्ययावत पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याचं काम मदर केअर हॉस्पिटल सातत्याने करत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!