Exams | Video | परीक्षा रद्द करा, अन्यथा ऑनलाईन परीक्षा घ्या!

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची मागणी; मडगावनंतर आता म्हापशात विद्यार्थ्यांची निदर्शने

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

म्हापसाः जगात कोविड-19 आजाराची दुसरी लाट असून राज्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेय. शुक्रवारी कोविड बाधित मिळण्याची दिवसभरातील संख्या 900च्या पार गेलीये. त्यामुळे गोवा सरकारने याकडे लक्ष केंद्रित करून दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा त्या ऑनलाईन माध्यमातून घ्याव्यात, अशी मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी म्हापशातील गांधी सर्कलकडे एकत्र येऊन केली.

हेही वाचाः NEET PG 2021 Postponed | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर NEET PG परीक्षा अखेर रद्द

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या परीक्षा घेणं धोक्याचं

राज्यात सध्या कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी लस देण्यात येत आहे. पण दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास जबाबदार कोण?

परीक्षा पुढे ढकलाव्यात अथवा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलीये. बहुतांश विद्यार्थी हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतात. बसेसमध्ये कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन पूर्णतः होत नाही. त्यामुळे आमच्या सुरक्षेबाबत कोण हमी देणार? विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असे सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेत.

परीक्षा रद्द करा, अन्यथा ऑनलाईन परीक्षा घ्या

विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी सरकारने ऑफलाईन परीक्षा रद्द कराव्यात, अन्यथा ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात, असं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचाः दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

अभ्यासक्रम पूर्ण नाही, मग परीक्षा कसली?

गोवा बोर्डाने दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्यात खऱ्या, पण या परीक्षांमध्ये आम्ही कितपत पास होऊ याची शंका आहे. कारण आमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने आम्हाला पूर्व परीक्षा (प्रीलिम्स) कठीण गेल्या होत्या. अशा परिस्थितीत बोर्डाच्या परीक्षा घेणं म्हणजे हा विद्यार्थ्यांवर केलेला निव्वळ अन्याय ठरेल. शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण जिवापेक्षा नाही, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गातून येतायत.

हा व्हि़डिओ पहाः Exam Issue | कोरोना रुग्ण वाढत असल्यानं परीक्षा पुढे ढकला,विद्यार्थी आक्रमक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!