पत्रादेवी चेक नाक्यावर होणार कडक तपासणी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: प्रवाशांच्या कोविड प्रमाणपत्रांची तपासणी न करताच वाहनांना सोडले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रादेवी पत्रादेवी चेक नाक्यावर आता प्रवाशांच्या प्रमाणपत्रांची तपासणी कठोरतेने करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.

चेक नाक्यावर येणाऱ्या बसेस आणि प्रवासी यांची दररोज नोंद ठेवणे बंधनकारक

कलम १४४ खाली जारी झालेल्या आदेशानुसार बसमधील प्रत्येक प्रवाशाच्या कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची तपासणी करावी. चेक नाक्यावर येणाऱ्या बसेस आणि प्रवासी यांची दररोज नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. चेक नाक्यावरील सुरक्षा यंत्रणा आणि देखरेख वाढवली आहे, असे उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी आदेशात म्हटले आहे.

करोनाबाधित मिळण्याचे प्रमाण कमी झाले, तरी

करोनाबाधित मिळण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे सरकारने राज्यातील कर्फ्यू सोमवारपर्यंत वाढवला आहे. गोव्यात प्रवेश करणारे बाहेरील राज्यांतील लोकांना ७२ तासांपूर्वीचे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. रविवारी नवी एसओपी सरकारने लागू केली आहे. चेक नाक्यावर तपासणीबाबत हलगर्जीपणा होतो, ही गोष्ट सरकारने मान्य केली आहे. प्रवाशांच्या प्रमाणपत्राची तपासणी होत नाही, असा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे.

मंगळवारी राज्यात तब्बल १०९ बाधित

दरम्यान, सोमवार ते मंगळवार या २४ तासांत राज्यात तब्बल १०९ बाधित मिळाले असून दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दहा दिवसांत बाधित मिळण्याचे प्रमाण १००हून कमी होते. आता पुन्हा १००हून अधिक बाधित मिळाल्याने चिंतेत भर पडली आहे.

हा व्हिडिओ पहाः COVID-19 | बाजारात गर्दी होऊनही रुग्णसंख्येत घट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!