राम-तारीवाडा-ओशेल येथे घडला विचित्र ‘योगायोग’, वाचा सविस्तर…

र्दुघटनेनंतर जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : तीन घरांवर तीन झाडे पडल्याने तिघे जखमी झाल्याची विचित्र घटना घडली आहे. याला विचित्र योगायोग असे म्हणू शकतो. या घटनेत तिनही घरांचे मोठे नुकसान झाले. घरातील अनेक व्यक्ती र्दुघटनेत जखमी झाल्या आहेत. या र्दुघटनेनंतर जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले.
हेही वाचा:विश्वजीत राणेंचा एसजीपीडीएला दणका…

घरांचे मोठे नुकसान

राम-तारीवाडा-ओशेल शिवोली येथे तीन घरांवर तीन झाडे पडल्याने तिघे जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. घरावर माड, फणस व आंबा अशी तीन झाडे पडली. त्यात घरांचे मोठे नुकसान झाले. यावेळी काही मंडळी घरात होती. ती या र्दुघटनेत जखमी झाली आहेत. जखमींना उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत म्हापसा अग्निशमन दलाचे जवान माड हटविण्याचे काम करत होते.
हेही वाचा:विज्ञानासह भाषा सुधारली; गणित मात्र कच्चे…

ओशेल शिवोली येथील घटना

राम-तारीवाडा-ओशेल शिवोली येथील बाबय चोडणकर, रवींद्र घाटवळ व प्रितेश चोडणकर यांच्या घरावर तीन झाडे पडून घराचे मोठे नुकसान झाले. पल्लवी चोडणकर, रवींद्र घाटवळ, रविना घाटवळ आदी या र्दुघटनेत जखमी झाले. त्यातील पल्लवी चोडणकर यांना शिवोली आरोग्य उपकेंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर घरी पाठविण्यात आले. तर रविना घाटवळ व रवींद्र घाटवळ यांना पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठविण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा रविना यांना प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले. रविंद्र घाटवळ गंभीर जखमी आहेत.
हेही वाचा:डॉमनिकच्या मर्सिडीजवरील माफ केलेला कर वसूल करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!