गोयंकारांच्या जीवाशी खेळणं थांबवावं

आम आदमी पक्षाचा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना सल्ला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोयंकरांच्या जीवाशी खेळणं थांबवावं. गोयंकारांना इव्हर्मेक्टिनच्या (Ivermection) गोळ्या नव्हे तर कोविडचा प्रसार रोखण्यासाठी पुरेशा लशींची गरज आहे, असा सल्ला आम आदमी पक्षाने आरोग्यमंत्री विश्‍वजित राणेंना दिला आहे. पुढच्या निवडणुकीसाठी पैसा जमविण्यासाठी भाजप गोयंकारांच्या घशात इव्हर्मेक्टिनच्या गोळ्या घालत असल्याचा आरोप आपने सरकारवर केला आहे.

हेही वाचाः ACCIDENT | बंगळुरु-कारवार एक्सप्रेस ट्रेनची हत्तीला धडक

इव्हर्मेक्टिनचा आग्रह कशासाठी?

आपच्या गोवा वैद्यकीय कक्षाचे प्रमुख डॉ. मारियान्हो गोडीन्हो यांनी गोव्याला इव्हर्मेक्टिनच्या गोळ्या देण्याच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केला. जेव्हा देशातील इतर राज्यांसह जगात कुठेही ही टॅब्लेट रोगप्रतिबंधक उपचारांसाठी वापरली जात नाही. आणि रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी तर नाहीच नाही. जागतिक आरोग्य संघटनेने विशेषत: त्याच्या वापराची शिफारस केलेली नाही आणि जगात इतरत्र कोठेही तो स्वीकारला जात नाही, मग गोवा सरकारनेच या गोळ्यांचा आग्रह का म्हणून धरलाय.

हेही वाचाः देशातला पहिला निकाल ; बलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला 12 वर्षांचा तुरुंगवास !

नेमलेल्या तथाकथित तज्ज्ञ कमिटीचा उल्लेख

गेल्या 19 दिवसांत कोविडमुळे 1000 हून अधिक गोंयकारांचा मृत्यू झाला आहे. मात्र जेव्हा यावर प्रश्न उपस्थित केले जातो, त्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे मात्र नेमलेल्या तथाकथित तज्ज्ञ कमिटीचा उल्लेख करतात, असा टोला ‘आप’च्या राहुल म्हांबरेंनी लगावलाय. तसंच सदर समितीत कुठलाही तज्ज्ञ व्यक्ती नाही. केवळ विश्वजित राणे यांच्या दुष्कर्मांवर पांघरूण घालणं हेच या समितीचं काम आहे, जे की लज्जास्पद आहे. राणे या तथाकथित समितीच्या एकाही सदस्याचे नाव का घेत नाही?,” असा प्रश्न म्हांबरेंनी उपस्थित केलाय.

हेही वाचाः कोविड-19 लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारच्या‌‌ महत्त्वाच्या सूचना

निवडणुकीसाठी फंड जमा करण्याचा फंडा

डॉक्टर असोसिएशनने स्पष्टीकरण दिलं की, भारतीय वैद्यकीय संघटनेशीसुद्धा या गोळ्यांविषयी सल्लामसलत केली गेली नाही. सदर गोळ्या गोव्यावर जबरदस्ती थोपविल्या गेल्यात, असा आरोप म्हांबरेंनी केला. इव्हर्मेक्टिनच्या गोळ्या भाजप आणि राणे गोंयंकरांवर जाणीवपूर्वक थोपवत आहेत. कारण पुढच्या निवडणुकीसाठी त्यांना फंड जमा करायचा आहे. तसंच सरकारने गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या की नाही ते सांगावं?  जर असेल तर हा करार कोणाकडे होता आणि किती पैसे यासाठी मोजले, ते स्पष्ट करावं, अशी मागणी म्हांबरेंनी केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!