स्टेरिओ चोरी प्रकरणः संशयितांना 8 दिवसांची पोलिस कोठडी

पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात झाली सुनावणी

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी:  म्हापसा, पणजी आणि पर्वरी परिसरात कार फोडून स्टेरिओ चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या पणजी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघां संशयिताना पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचाः हरवळे धबधब्यावर बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचं शव सापडलं

रविवारी पहाटे केली अटक

म्हापसा, पणजी आणि पर्वरी परिसरात सुमारे १८ कार फोडून स्टेरिओ चोरी केल्याप्रकरणी तक्रार नोंद केल्या होत्या. याची दखल घेऊन वरील परिसरातील पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असता, संशयित कर्नाटकात गेल्याची माहिती शनिवारी प्राप्त झाली. त्यानुसार पणजी पोलिसाचे पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलं होतं. त्या पथकाने खानापूर येथील एक होटेलात वास्तव केलेल्या जुबेर रहीस अमहेद (31, मुंबई आणि मूळ उत्तरप्रदेश), जगन्नाथ रामनाथ सरोज (46, मुंबई आणि मूळ उत्तर प्रदेश) आणि प्रदीप रवळनाथ गुरव (27, चंडगड कोल्हापूर ) या तिघांना रविवारी पहाटे ताब्यात घेतलं आणि नंतर गोव्यात आणून रितसर अटक केली.

संशयितांना 8 दिवसांची पोलिस कोठडी

संशयितांकडून चोरी केलेलं 15 लाखांचं सामान आणि ह्युंदाई कारही जप्त केली आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी पोलीस कोठडीसाठी तिघा संशयितांना सोमवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आलं. या वेळी न्यायालयाने संशयिताना आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

हा व्हिडिओ पहाः Crime | Follow Up | Major Development | सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी महत्त्वाची अपडेट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!