10 शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता आयोजित सोहळ्यात होणार पुरस्कारांचं वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने शनिवारी संध्याकाळी  2020-21 साठीचे राज्य पुरस्कार दहा शिक्षकांना जाहीर केलेत. काही मुख्याध्यापक, प्रिन्सीपल आणि अन्य स्तरावरील शिक्षकांचा यात समावेश आहे. 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4 वाजता आयोजित सोहळ्यात शिक्षकांना हे पुरस्कार प्रदान केले जातील.

हेही वाचाः VIDEO| आधी ट्रक चालकाशी वाद, नंतर स्वीकारली लाच

प्राथमिक शिक्षक विभागात 2 पुरस्कार

प्राथमिक शिक्षकांच्या विभागात उत्तर गोव्यातून चावडेवाडा पार्से पेडणे येथील सरकारी प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप तुकोजी म्हामल, तर दक्षिण गोव्यातून पैगिण काणकोण येथील सरकारी प्राथमिक शाळेचे शिक्षक विवेकानंद प्रभुगावकर यांना हा राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय.

माध्यमिक शाळा विभागात 4 पुरस्कार

माध्यमिक शाळा विभागात उत्तर गोव्यातून वाळपई सत्तरी येथील सरकारी हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका विद्या कृष्णा म्हाळशेकर, हिलटॉप रायबंदर येथील बाल भारती विद्यामंदिरचे कला शिक्षक अविनाश दत्ताराम विर्नोडकर, तर दक्षिण गोव्यातून आके मडगाव येथील गुजराती समाज विशेष शाळेतील विशेष शिक्षक महादेव शिंदे आणि बाळ्ळी केपे येथील सरकारी हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका एल्बा नोरोन्हा यांना हा राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय.

हेही वाचाः ‘संघाला पाठिंबा देणारे तालिबानी मानसिकतेचे’

हायस्कूल मुख्याध्यापक विभागात 2 पुरस्कार

हायस्कूल मुख्याध्यापक विभागात उत्तर गोव्यातून बांबोळी येथील कुजिरा एज्युकेशनल कॉम्प्लेक्समधील के.बी.हेडगेवार हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास रामनाथ सतरकर, तर दक्षिण गोव्यातून बोर्डा मडगाव येथील गव्हरमेंट मल्टिपर्पज हायर सेकंडरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सिंधु प्रभु देसाई यांना हा राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय.

उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक 1, तर उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य विभागात 1 पुरस्कार

उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षक विभागात संपूर्ण गोव्यातून माशे, लोलये, काणकोण येथील एस.एस.आग्नेल उच्च माध्यमिक विद्यालयाच्या टीचर ग्रेड-। चंद्रलेखा दामोदर मेस्त्री यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. तर उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य विभागात संपूर्ण गोव्यातून कुजिरा बांबोळी येथील वसंतराव धेंपे कला, विज्ञान आणि वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य रुपा संजय प्रभू खोपे या राज्य शिक्षक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

हा व्हिडिओ पहाः DOG ATTACK | कुत्र्यांकडून 20 पेक्षा अधिक चावे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!