राज्य सरकारला केंद्राकडून मिळाली मदत; मुख्यमंत्र्यांची ट्विटद्वारे माहिती

केंद्राने दिले ३२३ ऑक्सिजन कॉंन्सट्रेंटर; भारतीय हवाई दलाकडून आणण्यात आले गोव्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेने खळबळ उडाली आहे. राज्यात वैद्यकीय ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे रोज कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागतोय. अशा परिस्थितीत, ऑक्सिजनसाठी बरेच पर्याय शोधले जात आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत ऑक्सिजनच्या बाबतीत राज्यासाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येतेय. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी ट्विट करून याविषयी सांगितलंय.

हेही वाचाः गोव्याहून मुंबईला निघालेल्या लक्झरी रोखल्या !

नक्की काय आहे बातमी?

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना राज्यासाठी एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. राज्य सरकारला केंद्राकडून ३२३ ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर प्राप्त झाले आहेत. त्यामुळे थोड्या प्रमाणात काही होईना, यातून राज्याला मदत होणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

केंद्राने राज्यासाठी ३२३ ऑक्सिजन कॉन्सट्रेंटरची मंजुरी देऊन मोठे उपकार केले आहेत. राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजनच्या अभावी लोकांचे प्राण जातायत. त्यामुळे केंद्राकडून मिळेलेल्या या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानलेत.

भारतीय हवाई दलाकडून ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर राज्यात दाखल

केंद्राकडून मंजुर करण्यात आलेले हे ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर राज्यात सुखरूप आणण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून मोठी मदत मिळाली आहे. हवाई दलाने संपूर्ण काळजीपूर्वक हे ३२३ ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर राज्यात आणले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

हेही वाचाः 12 दिवसांत गोव्यात 706 मृत्यू! दुसऱ्या लाटेत कल्पनाही करता येणार नाही एवढा प्रचंड फटका

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणजे काय

ऑक्सिजन सिलेंडरला पर्याय म्हणून “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर” सद्य स्थितीत चर्चेचा विषय आहेत. तज्ज्ञांच्या मते, मध्यम स्वरूपाचा कोरोनासंसर्ग असलेल्यांना आणि ज्यांची ऑक्सिजन लेव्हल 85 ते 90 मध्ये आहे. अशांना घरी “ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर” चा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे इलेक्ट्रिसिटीवर चालणारं एक मशीन आहे. फुफ्फुसांचे आजार असलेल्या किंवा कोरोना रुग्णांना गरज पडल्यास घरच्या-घरी या मशीनच्या मदतीने ऑक्सिजन दिला जाऊ शकतो.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!