बापरे! उद्यापासून 3 दिवस पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

राज्य हवामान खात्याचा अंदाज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात २१ ते २३ मार्च या कालावधीत तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज राज्य हवामान खात्याने शुक्रवारी वर्तवला आहे. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा भाजीपाला तसेच विविध पिकांची हानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

गोव्याशेजारी गारपिटीची शक्यता

वातावरणात झालेल्या बदलामुळे २१ ते २३ मार्च या कालावधीत राज्यातील विविध भागांत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह शेजारील महाराष्ट्र, कर्नाटक या भागांतही पावसासह गारपिटीचीही शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

पुन्हा अवकाळीचं सावट

दरम्यान, १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीतही संपूर्ण राज्यात पावसाच्या सरी कोसळल्या होता. दक्षिण गोव्यातील केपेसह इतर काही भागांत गारांचाही पाऊस पडला होता. त्याचप्रमाणे २१ ते २३ मार्च या कालावधीतही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाबाधितांची संख्या आणखी वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडल्यास त्यात आणखी वाढ होऊ शकते, असा दावा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे.

भाज्या महागणार?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार तीन दिवस पाऊस कोसळल्यास त्याचा गोव्यासह इतर राज्यांतील भाजीपाला आणि पिकांनाही फटका बसू शकतो. त्यामुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वाढण्याची शक्यता आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!