हात जोडून एकच विनंती करतो, तुम्ही सुरक्षित राहा- विश्वजीत राणे

व्हिडीओ जारी करत कोविड योद्ध्यांचं केलं कौतुक

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारी कोरोनामुळे राज्यात एकाही कोरोना बळी गेला नव्हता. बरोबर आठ महिन्यानंतर हा दिवस राज्यानं पाहिला. दरम्यान, मंगळवारी पुन्हा ४ रुग्ण कोरोनामुळे दगावले. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते आहे. या सगळ्यातच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी कोविड योद्ध्यांचं कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत. शिवाय कोरोनाच्या संभाव्य धोका पाहता लोकांनी एसओपी, मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांचं पालन सातत्यानं करण्याचं आवाहनही केलं आहे.

सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की, प्रत्येकानं सुरक्षित राहावं, अशाप्रकारचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केलं आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटचं निदान राज्यात व्हावं, यासाठीही उपाययोजना सरकार करत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.

पाहा काय म्हणाले आरोग्यमंत्री –

सोमवारी राज्यात कोविडमुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नव्हती. शिवाय 108 नवे रुग्ण आढळल्यानं दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी कोविडमुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यातील तिघांचा बांबोळीच्या जीएमसीत, तर एकाचा रेडकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

मंगळवारी आरोग्य खात्यानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चोवीस तासांत नवे 164 रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरत असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज्यात आतापर्यंत 3 हजार 101 जणांचा कोविडमुळे मृत्यू झालाय, तर सध्या 1 हजार 732 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा : Video | Accident | Railway Accident | रेल्वेच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!