राज्य सरकारने सर्व क्षेत्रात स्थानिक भाषेलाच प्राधान्य द्यावे : मनोज परब

निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याचे केेले स्वागत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारच्या मंत्री निर्मला सीतारामन यांनी बँक क्षेत्रात स्थानिक भाषेलाच प्राधान्य द्यावे असे वक्तव्य केले होते. या निर्णयाचा रेवोलुशनरी गोवंन्स चे प्रमुख मनोज परब यांनी स्वागत केले आहे. काल पणजी येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा:Crime | कळंगुटमध्ये ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा…

गोव्यात अनेक शिक्षित तरुण वर्ग बेरोजगार

प्रत्येक बँकेत नोकर भरती करताना स्थानिक भाषा ज्ञात असलेल्यांना प्रथम प्राधान्य द्यावे. गोवा राज्यात अनेक बँक मध्ये कोंकणी बोलता समजता न येणारा नोकरवर्ग कामाला आहे आणि यामुळेच लोकांना तसेच कामगारांना भरपूर त्रास सहन करावा लागतो. आज गोव्यात अनेक शिक्षित तरुण वर्ग बेरोजगार आहे, राज्य सरकारचे ह्या विषयाकडे अजिबात लक्ष नसून बँक क्षेत्रावर सुद्धा सरकारचा ताबा नसल्याची टीका मनोज परब यांनी केली.
हेही वाचा:Cricket | आयसीसीकडून नियमांमध्ये ‘मोठे बदल’, ‘हे’ आहेत नवे नियम, वाचा सविस्तर…

सरकारकडून बाहेरील लोकांना नोकऱ्या देण्यात येतात

गोव्यातील बँकिंग क्षेत्र खूप मोठे आहे. गोव्यात ४६ बँक आहेत, त्यात १२ पब्लिक सेक्टर, १७ खासगी क्षेत्रात तर १४ कॉर्पोरेट बँक्स आहेत. आमच्या गोव्यात बेरोजगारीची संख्या जास्त आहे, राज्यातील तरुणांना नोकरी नाही आणि दुसरीकडे सरकारकडून बाहेरील लोकांना नोकऱ्या देण्यात येतात. राज्यात एकूण ७८० ब्रांच आहेत आणि त्यामध्ये सरकारने ठरवले तर कित्येक स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो, पण सरकार त्यामध्ये पूर्ण अपयशी ठरलेले आहेत. ही खेदाची गोष्ट असल्याची परब म्हणाले.
हेही वाचा:Crime| पर्रा येथे दोघांवर सुऱ्याने हल्ला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!