ओटीएस योजना लॉन्च, विजेनंतर आता पाणी बिलासाठीही लवकर योजना

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : थकीत वीज बिलासाठी ओटीएस योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी वीजमंत्री नीलेश काब्रालही उपस्थित होते.
1 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पूर्णपणे डिजीटल असणाऱ्या या योजनेचा राज्यातील सामान्य लोकांना लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. वीजमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी वीज खात्यातील अधिकाऱ्यांचे ही योजना यशस्वीपणे राबवण्याबाबत शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी वीज खात्यातील अधिकाऱ्यांचे या योजनेबाबत अभिनंदनही केलंय.
विजेनंतर आता पाण्यासाठीही OTS?
राज्यात विजेसाठी जशी ओटीएस योजना राबवण्यात आली आहे, तशीच थकीत पाणी बिलासाठीही योजना आणण्याचा सरकार विचार करतंय. PWDशी बोलून लवकरच सेम योजना आणण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हटलंय. या योजनेचा सामान्यांना फायदा होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.